spot_img
spot_img

कोल्हार उपबाजारात गहू २२४६ रुपये क्विंटल

कोल्हार ( वार्ताहर ) :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल गुरुवार दि. १८ मे २०२३ रोजी गव्हाची ५८ क्विंटल आवक झाली. गहू कमीत कमी २१०० रुपये तर जास्तीत जास्त २२४६ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला. गहू सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला.
 

तसेच कोल्हार उपबजारात सोयाबीनची १३ क्विंटल आवक झाली. सोयाबीन कमीत कमी ४८०० रुपये तर जास्तीत जास्त ४८७० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला. सोयाबीन सरासरी ४८४० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली. हरभऱ्याची ८ क्विंटल आवक झाली. हरभरा कमीत कमी ४५०० रुपये तर जास्तीत जास्त ४५६० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला. हरभरा सरासरी ४५३० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!