श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- राज्याचे महसूल मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा उद्या शनिवार दि. १५ जून रोजी वाढदिवस असल्याने श्रीरामपुरात त्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यासाठी यावेळी श्रीरामपुरातील विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.
या बैठकीत तालुकाध्यक्ष दिपक अण्णा पटारे, विधानसभा अध्यक्ष नितीन दिनकर, शरदराव नवले, नानासाहेब पवार, रवि पाटील, केतन खोरे, गिरीकर आसने, नाना शिंदे, अभिषेक – खंडागळे, पांडुरंग आठरे, बाबा चिडे, संदिप चव्हाण, रामभाऊ लिप्टे, भाऊसाहेब बांदे, गणेश मुद्गुले, मारुती बिंगले, गणेश राठी, नानासाहेब तनपुरे, संदिप शेलार, भिमराज बागुल, विठ्ठलराव राऊत, दत्ता जाधव, मिलिंदकुमार साळवे, सतिष सौदागर, अॅड. प्रविण लिप्टे, रुपेश हरकल, महेंद्र पटारे, विशाल अंभोरे, पुष्पलता हरदास, मनोज नवले, रामभाऊ तरस, आसिफ पोपटिया, नितीन बांगडे, दिलीप भालेराव, जितेंद्र छाजेड, दीपक चव्हाण, महेश खरात, शंकरराव मुठे, सचिन गिरमे, अक्षय मांजरे, नारायण काळे, अरुण काळे, मुकुंद हापसे, विजय सदाफळ, सतीश कानडे, योगेश ओझा, प्रसाद बिंदीकर, सुबोध शेवंतेकर, प्रतिक वैद्य, पंकज करमासे पोपटराव जाधव यांच्यासह कार्यकर्ते या नियोजनाच्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. या सर्व – पार्श्वभूमीवर श्रीरामपुर शहर आणि तालुक्यात महायुतीच्या – उमेदवाराला लिट मिळालेला आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेहमीच श्रीरामपूरवर प्रेम केलेले आहे. श्रीरामपूरला अनेक योजना त्यांनी मंजूर केल्या. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.
श्रीरामपूरला ७०कोटीची योजना मंजूर केली. शेती महामंडळाचा प्रश्न तर सोडवलाच पण वर्ग २ ची जमीन वर्ग – करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. श्रीरामपुरात सह. नगररचना कार्यालय आणले असेअनेक श्रीरामपूरच्या हिताचे निर्णय ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आपण त्यांचा यथोचित गौरव करण्याचा निर्णयया बैठकीत घेण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातून कार्यकर्ते घेवून येवून प्रत्येक गावाच्यावतीने याठिकाणी सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. शहरातील दळवी वस्ती येथील स्वयंमवर मंगल कार्यालय येथे उद्या शनिवार दि. १५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता हा सत्कार समारंभ होणार आहे.
तरी या सत्कार समारंभास सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच विखे पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व थरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तसेच ना. राधाकृष्ण विखे पाटील मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.