21.2 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

कुत्र्यांच्या हल्ल्यात घायाळ हरणास जीवनदान

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-दि.१३ रोजी संध्याकाळी निर्मळ पिंपरी येथील सोमेश्वर घोरपडे यांच्या गट नंबर ८१६ मधील वस्ती शेजारी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण गंभीर जखमी झाले. सोमेश्वर घोरपडे यांनी हरणाला मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले, परंतु तोपर्यंत कुत्र्यांनी हरणाला खुप घायाळ केले व पायाला चावा घेऊन पायाचे हाड पूर्णपणे मोडले. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र अजय बोधक यांनी आपल्या रिक्षातून वेदनेने विव्हळत असलेल्या हरणास लोणीला आणले व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. सदर घटना प्राणीमित्र म्हस्के यांनी नगरच्या उपवनसंरक्षक अधिकारी सौ सुवर्णा माने, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, संगमनेरचे उपवनसंरक्षक अधिकारी संदीप पाटील,कोपरगावच्या वनपरीक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा सोनवणे यांना माहिती दिली.

माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के व पशुवैद्यकीय दवाखाना- लोणी चे पशुधन विकास अधिकारी- डॉ. श्रीकांत घोरपडे व वनरक्षक श्री गजेवार हे तातडीने रात्री १० वाजता दवाखान्यात हजर झाले व नर हरणावर तातडीने उपचार सुरू केले. हरणाच्या एका पायाचा तुकडा पडला होता आणि कुत्र्यांच्या चाव्याच्या खूप जखमा होत्या. त्या जखमा साफ करून डॉ . घोरपडे यांनी वैद्यकीय उपचार करुन नंतर भुलीचे इंजेक्शन देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. हरीण रात्री १:३० वाजता शुद्धीवर आले. आज हरीण सुखरूप असून व्यवस्थित पायांवर चालत आहे.

डॉ. श्रीकांत घोरपडे यांनी रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत दवाखान्यात येवुन जखमी हरणावर उपचार करून हरणाचे प्राण वाचवले, त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे यावेळी प्राणीमित्र विकास म्हस्के, सर्पमित्र अजय बोधक, आर्यन गायकवाड यांनी हरणाला वाचवण्यासाठी खुप प्रयत्न केले त्यांचेही परिसरातून कौतुक होत आहे व त्यात यश आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!