लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-ममदापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय येथे शिर्डी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील,मंत्री महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास तथा पालकमंत्री अहमदनगर यांच्या वाढदिवसानिमित्त, एज्रा फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. राजूभाऊ खंडीझोड यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना 250 छत्र्यांचे वाटप करण्यात आले,
तसेच इयत्ता पाचवीच्या नवागतांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. शालेय परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले.तसेच आडगावचे सरपंच श्री.सुनील बर्डे यांच्याकडून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गणेश काटे साहेब मुंबई, देवदत्त धोंगडे पी.ए मुंबई, संजय वाणी पी.एस.ओ. मुंबई, रोहिदास आभाळे पी.एस.ओ. मुंबई ऑफिस ,राजाभाऊ खंडीझोड,सामाजिक कार्यकर्ते भावेश ब्राह्मणे,आडगावचे सरपंच सुनील बर्डे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील जवरे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक.शब्बीरअली पटेल, प्रवरा बँकेचे मा.संचालक केशवराव जवरे , .पांडुरंग ससाने, मा.मुख्याध्यापक .मुस्ताक शेख,श्री.आकाश जाधव, पंकज गोरे सौ.राजश्री गोरे, सौ.अनुराधा शेळके, सौ.सुनीता घोरपडे सौ. छाया ससाने सौ.सोनाली टिळेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. मुख्याध्यापक श्री.रामदास ब्राह्मणे यांनी केले सूत्रसंचालन श्री.सोमनाथ बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. लहानु माळी सर यांनी केले.