संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-विखे पाटील परीवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासून केलेल्या कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ते करीत असलेली वाटचाल खूप महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.
महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रहीमपूर येथे सचिन शिंदे आणि पप्पू गाढे यांच्या पुढाकाराने गरजू कुटूबियांना किराणा किटचे वितरण निवृती महाराज इंदुरीकर यांच्या हस्ते करण्यात आले.पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारगान्याचे चेअरमन कैलास तांबे सरपंच सविता शिंदे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक गणपत शिंदे गोकुळ दिघे उपसरंच राहुल गुळवे यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या भाषणात म्हणाले की विखे पाटील परीवार तीन पिढ्या समाज जीवनात आहे. राजकारणा पेक्षाही समाजकार्याला त्यांनी अधिक प्राधान्य दिले.कोणतेही संकट असो विखे पाटील परीवार हे धावून जाते.सर्वच क्षेत्रांत त्यांचे काम असल्याने त्यांची मदत समाजातील सर्व घटकांना होत असते.
मंत्री विखे पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने संपन्न करण्याचा कार्यकर्त्यानी घेतलेला निर्णय सुध्दा कौतुकास्पद असून या अभिष्टचिंतन सोहळ्यातून सामाजिक दायित्वाचा संदेश मिळाला असल्याचे इंदोरीकर म्हणाले.
या कार्यक्रमास अरूण शिंदे गजानान शिंदे संजय खुळे रघूनाथ शिंदे गोरक्षनाथ वांळूज बाळासाहेब वर्पे किरण महाराज शेटे सुहास ब्राम्हणे प्रदीप गायकवाड नानासाहेब शिंदे राजेंद्र वांळूज राजैंद्र गाढे सुशील शिंदे अमोल शिंदे अमोल मोरे लखन मोरे आदी उपस्थित होते.