लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त प्रवरा माध्यमिक विद्यालय चिंचपूर व जिल्हा परिषद शाळा चिंचपूर येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलासनाना तांबे पाटील, प्रवरा सहकारी बँकेचे संचालक गीताराम पाटील तांबे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव रामभाऊ तांबे, लक्ष्मण तांबे, प्रवरा बँकेचे मा.संचालक गजाबा तांबे, चंपालाल पारधे,A.D.C.C. बँकेचे मा. शाखाअधिकारी नामदेव साहेब तांबे, श्रीरंग तांबे, दगडू तांबे, मा.सरपंच गीताराम पवार, शांताराम तांबे, भाऊसाहेब अनर्थे, आदी मान्यवर उपस्थित होते.