spot_img
spot_img

प्रवरेच्या विद्यार्थीनीचे जाणे मनाला वेदनादायी -सौ.विखे 

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-मेंढवण येथे शेत तळ्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटूबियांची भेट घेवून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनीताई विखे पाटील यांनी दिलासा दिला.प्रवरेच्या विद्यार्थीनीचे जाणे अतिशय वेदनादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यामातून शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

विशेष म्हणजे अनुष्का बढे आणि सृष्टी ढापसे या प्रवरा कन्या विद्या मंदीर विद्यालयाच्या विद्यार्थीनी असल्याने या दुर्दैवी घटनेचे दुख प्रवरा परीवारालाही झाले पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त करून कुटूबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनी विखे पाटील यांनी मेंढवण येथे या कुटूबियांची भेट घेवून या संपूर्ण संकटात विखे पाटील परीवार तुमच्या समवेत असल्याचे सांगितले.कोणत्याही मदतीने हे नूकसान भरून येणारे नाही.तरीही पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यामातून विद्यार्थ्याना असलेल्या शासकीय योजनेतून मदत मिळवून देणार असल्याचे याप्रसंगी भाजपा विधानसभा प्रमुख अमोल खताळ भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष रोहिदास साबळे भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ भाजप शहर सरचिटणीस राहुल भोईर कवठे कमलेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!