spot_img
spot_img

जिद्द व चिकटी तसेच ठेवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास केल्याने निश्चितच यश मिळते – माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-जिद्द व चिकटी तसेच ठेवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास केल्याने निश्चितच यश मिळते असे मत माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. विविध स्पर्धा परीक्षा मधून सरळ सेवेत उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या राहुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते राहुरीतील संपर्क कार्यालयात सन्मान करण्यात आला .

राहुरी तालुक्यातील दोन विद्यार्थिनी व सहा विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षा मार्फत सरळ सेवेत नुकतीच निवड झाली. या निमित्ताने आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थी पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार तनपुरे म्हणाले की राहुरी कृषी विद्यापीठात राज्यातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अभ्यास करत परीक्षा देतात.

राहुरी नगरपालिकेकडून नवी पेठ येथील लवकरच दोन कोटी रुपये खर्च करून अध्यावत अशी ग्रंथालय व अभ्यासिका निर्माणचे लवकरच पूर्णत्वास जात आहे या अभ्यासिकेचा स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल. राहुरी शहरासह तालुक्यातील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा मार्फत राहुरी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले कुटुंबाचे व तालुक्याचे नावलौकिक करत आहेत याचा आपल्याला अभिमान असून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी अधिकारी पदावर गेल्यावर समाजाच्या कामासाठी आपण या पदावर आहोत याचे नेहमी भान ठेवावे. कोणतीही व्यक्ती व पदाधिकारी यांच्या दबावाला न जुमानता खंबीरपणे नियमाप्रमाणे कामे करावीत असे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

यावेळी श्यामची आई हे पुस्तक साईबाबांची प्रतिमा आणि शाल देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी अमोल अशोक शिंदे व गोविंद चांगदेव वने यांची पोलीस उपनिरीक्षकपदी प्रियंका अनिल आघाव व प्रतीक्षा संभाजी कोळसे स्थापत्य अभियंता जलसंपदा विभाग . सत्यम मोरे करन्सी प्रेस नाशिक. नितीन बाबासाहेब खळेकर महसूल विभाग. अक्षय कैलास धिमते लेखा अधिकारी नगरपालिका विभाग.

यावेळी डॉ. बा .बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भारत तारडे , माणिक तारडे , बापू कोबरणे, अशोक लांबे , प्रशांत वाबळे, संभाजी कोळसे , राम तोडमल, असफ पठाण , अनिल आघाव ,सुधीर गावडे ,सुरेश निमसे, सुशील कदम , सौ. अश्विनी कुमावत ,विनीत तनपुरे , महेश उंडे ,संदीप जरे , शंकर कल्हापुरे, सम्राट दिंडे, आकाश नारद, राहुल सुपेकर आदिंसह विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ उपस्थित होते .सूत्रसंचालन भारत तारडे यांनी तर आभार सुधीर गावडे यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!