11 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार श्रीरामपुर शहर पोलीसात तरूणावर बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – घरात कोणी नाही आणि मुलगी एकटीच आहे, याची संधी साधून शेजारीच राहणाऱ्या तरूणाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तरूणावर बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. २ परिसरात सनी चौक परिसर आहे. या परिसरात हा २० वर्षीय तरुण राहतो. त्याच्या शेजारी पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटूंबीयांसमवेत राहते.

पिण्याचे पाणी भरण्याची मोटर अल्पवयीन मुलीच्या घरी वापरायला दिलेली होती. पाण्याची मोटर परत घेण्यासाठी हा आरोपी शेजारी असणाऱ्या या अल्पवयीन मुलीच्या घरी गेला. तेव्हा घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने सदर मुलीवर बळजबरीने बलात्कार केला.

या प्रकरणी पोलिसात पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनोद देठे (वय २०, रा. श्रीरामपुर) याच्यावर भादंवि कलम ३७६ सह पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी फोटोग्राफीचे दुकान असणाऱ्या एकाने मुलीशी प्रेम संबंध निर्माण करत तिला शिर्डीला नेवून तिच्यावर बलात्कार केला होता. लग्नाचे आमीष तिला दाखवण्यात आले होते. याच शिर्डीमध्ये झालेल्या शरीर संबंधाचा व्हिडीओ त्याच्या दोघा मित्रांनी काढला आणि तो व्हिडीओ दाखवत त्या दोघा मित्रांनी या मुलीवर श्रीरामपूर बस स्टँडसमोरील कॅफेमध्ये बलात्कार केला असल्याचेही  नागरिकांतून बोलले जात होते.

सदरील घटना ताजी असताना पुन्हा श्रीरामपुरात बलात्काराची घटना घडल्याने पालकांसह नागरिकांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!