नाशिक येथील मुक्त विद्यापीठाच्या तीन सदस्य समितीने कृषी महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक तसेच कृषि शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व भौतिक सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, प्रात्यक्षिकांसाठी १०० एकर प्रक्षेत्र, प्रत्यक्ष कार्यानुभवासाठी कृषी आधारित विविध प्रकल्प, डिजिटल क्लासरूम आदी बाबी तपासून “अ” दर्जा दिला आहे.
प्रवरेच्या कृषी महाविद्यालयातील मुक्त कृषी शिक्षण केंद्रास “अ” दर्जा प्राप्तकृषि शिक्षणासोबतचं विस्तार कार्यात ही अग्रेसर
लोणी दि.१७ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील मुक्त कृषी शिक्षण केंद्राचे मूल्यमापन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील तज्ञ समिती मार्फत करण्यात आले असून या केंद्रास अ दर्जा प्राप्त झाल्याची माहिती कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे यांनी दिली.
कृषी शिक्षणाची आवड असणारे परंतु वंचित राहिलेले दहावी, बारावी पास किंवा नापास विद्यार्थी तसेच शेतीची आवड असणारे तरुण शेतकरी आणि ग्रामीण युवकांना नोकरी करत असलेले परंतु कृषी शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्यांना कृषि पदविकेनंतरही मराठी भाषेतून कृषि शिक्षणांतून करिअर करता यावे या द्देशाने संस्थेने मुक्त कृषी शिक्षण केंद्र सुरू केले आहे. सदर मुक्त कृषी शिक्षण केंद्रामार्फत माळी प्रशिक्षण, कृषि आधिष्ठान, उद्यानविद्या पदविका, कृषी पत्रकारिता कृषी व्यवसाय व्यवस्थापन, फळबागा उत्पादन, भाजीपाला उत्पादन व फुलशेती पदविका आदी कृषिविषयक अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.
कृषी महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे आदींनी अभिनंदन केले आहे.
प्रवरेच्या कृषि संलग्नित महाविद्यालयामध्ये गांडूळ खत प्रकल्प,रोपवाटीका,व्हर्मीवाॅश,जैविक खते आणि औषधे,फळ प्रक्रिया या युनिट बरोबरचं वेळोवेळी विद्यार्थ्याना थेट बांधावर जावून शेतीचे ज्ञान दिले जाते.कृषि शिक्षणांसोबतचं विस्तार कार्याबरोबरचं नोकरी आणि स्वयंरोजगावर भर दिल्या.हे महाविद्यालय राज्यात अव्वल स्थानावर आहे.



