अहमदनगर ( जनता आवाज वृत्तसेवा ): – नगर दक्षिण मधून नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके हे संसदेत खासदार पदीची शपथ इंग्रजीमध्ये घेतली यावेळी अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांच्या वतीने लाईव्ह स्क्रीन लावून शपथविधी बघण्यात आले.
तसेच शपथविधी झाल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, अमोल कांबळे, प्रवीण वारुळे, गणेश रोडे, सचिन कराळे, सागर जपकर, शिवाजी कराळे, संचित निकम, रवी धनवटे, सौरभ सुंबे, सुरेश कसाब, अक्षय शिंदे, गणेश तोडमल निलेश लंके प्रतिष्ठान सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.