लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा):-संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पालखीचे शुक्रवारी सकाळी सहकार पंढरी लोणीत हरीनामाचा जयघोषात आगमन झाले. या पालखीमध्ये ५१ दिंड्या आणि हजारो भाविक या सहभागी झाले होते. भगवी पताका आणि हरिनामाचा जयघोष करत या पालखीचे भव्य दिव्य स्वागत लोणी येथे माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी या दिंडीचे स्वागत केले.
सर्वात मोठी पालखी सोहळा म्हणून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याकडे बघितले जाते. शासनाच्या वतीने देखील या वर्षापासून प्रत्येक पायी दिंडी सोहळ्यासाठी 20 हजाराचे अनुदान देण्याबरोबरच पायी दिंडी सोहळा सुकर होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निर्मल वारी, आरोग्यदायी वारी याबरोबरचं अनेक सुविधा दिल्या त्याचाही चांगला फायदा वारकरी भाविकांना होत आहे. मागील वर्षापासुन महायुती सरकारने आषाढी वारीसाठी स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा आणि पाणी पुरवठा आदी सुविधा दिल्याने पायी दिंडीचा प्रवास सुखकर होत असल्याचे असे निवृत्ती महाराज दिंडीच्या अध्यक्षा ह.भ.प.कांचनताई जगताप यांनी सांगितले. मागील दोन वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि जिल्हात पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महायुती सरकारने दिलेल्या सुविधामुळे वारीच्या मार्गावर होणारी गैरसोय आता दुर होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या पालखी सोहळ्यामध्ये माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, लोणी येथील भजनी मंडळ, आणि ग्रामस्थांनी महाप्रसादाचे तसेच पावसापासून संरक्षण होण्यासाठी वारक-यांना साहित्याचे वाटप केले. यावेळी दिंडीच्या अध्यक्षा ह.भ.प. कांचनताई जगताप, महादेव महाराज मुंडाळे, राहुल महाराज सांळुखे, प्रसिध्दी प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, पालखी प्रमुख जयंत महाराज गोसावी, अनिल महाराज गोसावी आदींचा प्रवरा परिवाराच्या वतीने सत्कार केला.