कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) :- वेलफेअर फाउंडेशन, संगमनेर (गुंजाळवाडी पठार) संस्थेच्या वृंदावन कृषी महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.वृंदावन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. उंबरकर म्हणाले की, जातीभेद निर्मुलन ते शेतीचा विकास करणारे, दिन दलित व वंचित समाजाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व त्यांच्या उन्नतीसाठी अनेक लोककल्याणकारी योजना प्रथमतः राबविणारे, वंचित, दिन दलितांच्या मुला-मुलींना शिक्षणाचे दार खुले करणारे, दलित व बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, म्हणून वसतिगृहांची स्थापना करणारे, आरक्षणाचे जनक मानले जाणारे, शिक्षणानेच समाजाची सर्वांगीण प्रगती होऊ शकते, हे ओळखून शिक्षणातून मोठ काम करणारे थोर राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मानवतावादी विचारांचा आदर्श तरुण पिढीने घेणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमासाठी डॉ. आर. एस. गुंजाळ, प्रा. डी. बी. गोलांडे, डॉ. वाय. एस. एखंडे, डॉ. ए. जी. महाले, प्रा. ए. एन. सहाणे, प्रा. पी. ए. शेळके यांसह आदी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.




