spot_img
spot_img

प्रवरेच्या चिचोली येथील औषधनिर्माण महाविद्यालयातील चार मुलींची गुणवत्ता मुल्यमापन अधिकारी पदावर निवड

लोणी दि.१७( प्रतिनिधी):-लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महीला औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालातील मोहू- चिंचाली (ता.सिन्नर) येथील चार मुलींची पुणे येथील टी.सी.एम.एस गुणवत्ता मुल्यमापन अधिकारी येथे निवड झाल्याची माहीती प्राचार्या डाॅ.चारुशिला भंगाळे यांनी दिली.
    

ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण देतांनाच त्यांना रोजगार उपलब्धी यांवर संस्थेचा नेहमीच भर राहीला आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहू चिंचोली येथील महीला फार्मसी औषधनिर्माण महाविद्यालयातील कु.ओजस्विता खोसे,कु.साक्षी नरोडे,कु.श्रेया दंडवते,कु.शुभांगी सुर्यवंशी या चौथ्या वर्षातील मुलीची टी.सी.एम.एस,पुणे या कंपनी मध्येविदेशी वैद्यकिय क्षेञात रुग्णसाठी होणा-या औषधांच्या गुणवत्ता मुल्यमापनाच्या अधिकारी पदावर निवड झाली आहे. महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट विभागामार्फत वेळोवेळी विद्यार्थ्याना प्रशिक्षणे,प्रक्षेत्र भेटी कार्यशाळा व्यक्ती महत्व विकास, मुलाखत तंत्र या बरोबरचं माजी विद्यार्थी कडून नव्या तंञज्ञान माहीती दिली जात असल्याने शिवाय अनेक कंपन्याशी सामज्यश करार यामुळे शिक्षणांसोबत रोजगार हा हेतू साध होत आहे असे प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. विकास कुटे यांनी सांगितले.
 विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ.सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे,मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुश्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, प्राचार्य डाॅ.चारुशिला भंगाळे यांनी अभिनंदन केले.
  प्रवरेत शिक्षणासोबत आत्मविश्वास मिळतो.मनात मोठी भीती होती परंतु या चार वर्षात मिळालेले मार्गदर्शनातून पुढे जाता आले.आज मी आई वडीलांचे स्वप्नपुर्ण करु शकले हे केवळ प्रवरेमुळे शक्य झाले
           -श्रेया दंडवते
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!