श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- शाहू महाराज जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व महाराजांची माहिती देऊन जयंती साजरी करण्यात आली.केअर फोर सोसायटी हेल्थ तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही वाटप करण्यात आले.
याप्रसंगी केअरफॉर सोसायटी हेल्थच्या अध्यक्षा सौ प्रिया शाह मॅडम, उपाध्यक्ष – सौ निशा सरोदे मॅडम सदस्य सौ. विरल ठक्कर, सौ. स्नेहलता कुलथे मॅडम, सौ. कोमल बारापत्रे, सौ.प्राची आहेर, सौ.हर्षिता लुल्ला यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना 25 डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुनीताताई मोरगे, उपाध्यक्षा सौ.आशा पोपळघट, सौ.कविता थोरात, सौ. जयकर मॅडम तसेच शाळेच्या माजी शिक्षिका सौ. कर्डिले मॅडम, कुऱ्हे मॅडम आदी उपस्थित होत्या. सौ. प्रिया शाह मॅडम यांनी मुलांना आरोग्याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले.
सौ.निशा सरोदे मॅडम यांनी मुलांना ओमकार उच्चार व योगा विषयी महत्त्व सांगितले. तसेच सोनाली त्र्यंबके मॅडम यांनी सुवर्णप्राशनचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजय धाकतोडे सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रशांत पठाडे सर व आभार प्रदर्शन श्रीम. वर्षा वाकचौरे मॅडम यांनी केले.