लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- अहमदनगर जिल्हा क्रीडा असोसिएशन संघटनेमार्फत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल,लोणी येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. बी. बी अंबाडे यांनी दिली.
प्रवरा सैनिक स्कूल लोणी येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलच्या शेख मोहम्मद उमर अकिल याने 50 मीटर फ्री ब्रेस्ट या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला, तर शेख मोहम्मद अरकम अकिल याने 100 मीटर बॅक स्ट्रोक व 100 मीटर फ्री स्ट्रोक या दोन्ही प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. सदर दोन्हीही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रवरा पब्लिक स्कूलच्या जलतरणपटूंनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष अभिनंदन केले.तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या सी ई ओ डॉ. सुष्मिता विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त सी ई ओ डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे व श्री नंदकुमार दळे यांनीही त्यांचे कौतुक केले.
शाळेचे प्राचार्य डॉ. बी.बी अंबाडे, उपप्राचार्य श्री के. टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम एस जगधने, सौ. रत्नपारखी, क्रीडा संचालक श्री. रमेश दळे व इतर क्रीडा शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.