spot_img
spot_img

डॉ. महेश खर्डे यांची वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळात निवड

राहाता दि.१६ (प्रतिनिधी):-शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ.महेश खर्डे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळात नुकतीच सन्माननीय कुलगुरूंनी नेमणूक केली अशी माहिती प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप यांनी दिली.

डॉ. महेश खर्डे हे पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात गेल्या १८ वर्षापासून कार्यरत असून त्यांनी अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेऊन आपले शोध निबंध सादर केले आहे. तसेच त्यांचे विविध नामांकित जर्नल्स मध्ये २५ पेपर प्रकाशित झालेले आहेत.हर्बल कंपोजिशन कॉम्प्रेजिंग रुटा ग्रावेवलेन्स फॉर अँटी डायबेटिक, अँड अँटी टशिव इफेक्ट पेटंट प्रसिद्ध झाला आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत ०३ विद्यार्थ्यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी)ची पदवी संपादित केली आहे. व सध्या ०३ विद्यार्थी संशोधनाचे काम करीत आहे. विद्यार्थ्यांना सतत नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यावर त्यांचा भर असतो.

नुकतेच केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले असून ते यशस्वीपणे राबविण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
त्यांच्या त्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील, सिनेट सदस्य श्री.युवराज नरोडे, सिनेट सदस्य श्री.सचिन गार्डे संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, प्राचार्य प्रो.डॉ.सोमनाथ घोलप, प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, उपप्राचार्य संजय लहारे, डॉ.सुरेश पुलाटे,डॉ. दादासाहेब डांगे सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर सेवकांनी अभिनंदन केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!