कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय कोल्हार बु. ता. राहता जि. अहमदनगर येथे मुलांसाठी बांधलेल्या अत्याधुनिक व सुसज्ज अशा स्वच्छतागृह इमारतीचे उद्घाटन शुक्रवार दि.५ रोजी संपन्न झाले विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज संगमनेर येथे प्राध्यापक असलेले मा. श्री डॉ. सचिन दत्तात्रय खडे पा. यांनी आपल्या शाळेसाठी त्यांचे मित्र मा. श्री किरण पवार साहेब (प्लॅनिंग मॅनेजर जॉन्सन कंट्रोल पुणे) यांच्याकडे स्वच्छतागृहासाठीचा प्रस्ताव सादर केला व तो प्रस्ताव मंजूर होऊन श्री नरेश राऊत फाऊंडेशन केलवड यांच्याकडे बांधकामाची जबाबदारी देण्यात आली व त्यांच्या मार्फत न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार विद्यालयांमध्ये १३ ते १४ लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक व सुसज्ज असे मुलान साठी स्वच्छतागृह बांधण्यात आले.
यासाठी CSR उपक्रम अंतर्गत १० लाख रुपये जाॕनसन कंट्रोल कंपनी ने दिले व वरील ३ ते ४ लाख रुपये हे लोकसहभागातुन एकत्र करून काम पूर्ण करण्यात आले. या स्वच्छतागृहाच्या इमारतीचे उद् घाटन श्री नरेश राऊत फाऊंडेशन केलवडचे अध्यक्ष मा. श्री नरेश राऊत साहेब व सौ मीनाताई नरेश राऊत (उपाध्यक्ष श्री नरेश राऊत फाऊंडेशन केलवड) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मा. श्री अॕड. सुरेंद्र खर्डे पाटील (अध्यक्ष स्थानिक सल्लागार समिती) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री सुधीर वाघमारे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी नरेश राऊत फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. श्री नरेश राऊत साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या वेळी बोलतांना ते म्हणाले की जेवढे काम आपण समाजासाठी करतो त्या समाजाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो यासारखे पुण्य नाही, संपत्ती सुद्धा नाही. बंगला, गाडी यापेक्षा समाजासाठी काम करा हीच मोठी संपत्ती आहे मुलांनी मोबाईल वर खेळण्यापेक्षा मैदानावर खेळावे मैदानी खेळ खेळावे यामुळे आरोग्य चांगले राहील. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम करा आणि पुढे जा असा संदेश त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला आणि त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॕड. सुरेंद्र पाटील खर्डे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले व शाळेसाठी सर्व ग्रामस्थांनी भरभरून जे योगदान दिलेले आहे यामुळे भव्य अशी इमारत आणि मोठा परिसर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे परंतु बऱ्याच सुविधा कमी आहेत. वर्गामध्ये मुलांना उत्साह वाटावा म्हणून रंगकाम फरशी बसवणे अशा प्रकारची काम करणे गरजेचे आहे यासाठी श्री नरेश राऊत फाऊंडेशनने आम्हाला सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त मदत करावी अशा प्रकारची मागणी त्यांनी श्री नरेश राऊत फिऊंडेशनचे अध्यक्ष मा. श्री नरेश राऊत साहेब यांच्याकडे केली. ग्रामस्थांचा सुद्धा सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतोच परंतु तरीसुद्धा बरीचशी काम करण्यासाठी आर्थिक मदत श्री नरेश राऊत फाउंडेशन सारख्या संस्थानी करावी अशा प्रकारचे आव्हान त्यांनी केलं. या प्रसंगी त्यांनी सर्व मुलांना बांधलेले जे सुसज्ज असे स्वच्छतागृह आहे त्याची स्वच्छता राखण्याचे आव्हान केलं यावेळी मा. श्री भाऊ कुलकर्णी यांनी सुंदर वास्तू बांधली व दर्जेदार असं बांधकाम केले. व आर्किटेक शिरीष खर्डे पाटील यांनी सुद्धा डिझाईन सुंदर असं तयार करून दिल त्याबद्दल त्यांचा व ज्याच्या प्रयत्नाने ही वास्तू बांधण्यात आली असे मा.श्री डॉ.सचिन दत्तात्रय खर्डे पा.यांचा सत्कार स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.श्री अॕड. सुरेंद्र पाटील खर्डे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य सुधीर वाघमारे सर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती आंधळे मॅडम व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री ॲड. सुरेंद्र पाटील खर्डे यांच्या शुभहस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी मा. श्री प्रा. लक्ष्मण गोर्डे (सचिव श्री नरेश राऊत फाऊंडेशन केलवड) मा. श्री रमेश शिंदे साहेब (अध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटी शारदा हायस्कूल व ज्यु. कॉलेज राहता) मा.श्री किरण राऊत साहेब व सौ जयश्री राऊत मॅडम व स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सुरेश रंगनाथ खर्डे पाटील, मा. श्री संजय शिंगवी, मा. श्री अशोक शेठ आसावा, मा. श्री भाऊसाहेब शिरसाट साहेब व मा. श्री अजित रमेश मोरे पाटील व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन या वेळी इयत्ता १० वी सन- २०२२-२३ व सन-२०२३-२४ या बॕचच्या विद्यार्थ्यांनी संगीत साहित्य विद्यालयास भेट दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्बीर शेख सर व पल्लवी शिंदे मॕडम यांनी केले व आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी आंधळे मॅडम यांनी मानले