लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा १६ वा वर्धापन दिन शनिवार दि. ६ जुलै २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माजी विद्यार्थीनी डॉक्टर नमिता गांधी व डॉक्टर साक्षी ताजणे या उपस्थित होत्या.
डॉ. नमिता गांधी यांनी आपल्या भाषणातून मुलांनी शालेय जीवनात आनंदित रहावे व आपले शालेय जीवनातीलअनुभव सांगितले. तसेच प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल मधील माजी विद्यार्थिनी डॉक्टर साक्षी ताजने हिने शिक्षणाचे महत्त्व व शिस्तीचे महत्व पटवून सांगितले. आम्ही या शाळेतून कसे घडत गेलो हे सांगितले. या प्रसंगी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यातआला.
१६ व्या वर्धापन दिनाच्या दिवशी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केले होते. मनोरंजनात्मक खेळ उपस्थितांसाठी आकर्षण ठरले. रस्सीखेच खेळ खेळले गेले. कार्यक्रम संपल्यावर सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. आनंदी भडांगे हिने केले.
सदर कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री विजय आहेर सर, उपप्राचार्य श्री महेश गौरखेडे सर आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.