spot_img
spot_img

श्रीरामपुरात नामांकित कापड दुकानदाराकडून महिला कामगाराचा विनयभंग, पोलिसांकडून दुकानदार अटकेत

श्रीरामपूर ( प्रतिनिधी):- श्रीरामपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणा जवळ  एका नामांकित कापड दुकानदार मालकाने त्याच्या दुकानात अकाउंटंटचे काम करणाऱ्या पंचवीस वर्षाच्या तरुणीचे चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला आणि तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन अशी धमकी दिली.
या अशा प्रकारच्या घटनेने महिला कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे आहे. 
याप्रकरणी एका 25 वर्षे वयाच्या पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून दुकान मालक आरोपी संतोष सुगनचंद खाबिया वय-47 रा-वार्ड नंबर ६ श्रीरामपूर याच्या विरुद्ध भादवि कलम 354, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून फिर्यादीत विवाहित तरुणीने म्हटले आहे की दुकानात बॅगची रॅक आवरत असताना दुकान मालकाने हाताला हात लावून जवळ ओढून गालावर चुंबन घेऊन विनयभंग केला, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तरुणीने विरोध केला असता तू खालच्या जातीची आहे असे म्हणत जातीय वाचक बोलून तू माझे काय वाकडे करणार तुला व तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन अशी धमकी या व्यापाऱ्याने पीडित तरुणीला दिली. 
शनिवारी कापड दुकानात हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळी डीवायएसपी संदीप मिटके पोलीस निरीक्षक गवळी यांनी भेट दिली. पुढील तपास डीवायएसपी मिटके करीत आहे. याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!