बेलापूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- महिलानी दारूची बाटली गावातून कायमची हदपार केली.विशेष झालेल्या ग्रामसभेतून असंख्य महिलांनी दारुबंदीचा सर्वानुमते ठराव संमत करून ग्रामसभेने मंजुरी दिली.विशेष म्हणजे महिलांनी संघटित घेऊन लढा उभारलेल्याने अहमदनगर जिल्ह्यामध्ये यांची एकमात्र चर्चा सुरू झाली आहे.तालुक्यातील उक्कलगाव येथे गावामध्ये काही दिवसापूर्वीच नशायुक्त गोळ्याची विषारी दारु,देशी हातभट्टी,अवैधरित्या दारुमुळे एकाचा व्यक्तीचा मुत्यू झाल्याची घटना घडली होती.
त्यामुळे महिला आक्रमक झाल्याच्या चित्र पहावयास मिळाले.याप्रसंगी विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रविना शिदे ह्या होत्या.यावेळी ग्रामविकास अधिकारी राजाराम कांदळकर यांनी मागिल ग्रामसभेचे इतिवृत्त वाचन केले.यावेळी उपसरपंच नितिन थोरात, उर्मिला थोरात, सीमा तांबे, शरद थोरात, पुरुषोत्तम थोरात, बबन रजपूत,अर्चना रजपूत,अनिल थोरात,विजय तोरणे,आदी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.मात्र तरीदेखील जिल्हा परिषदेच्या आवाराबोहरील दुकानावरून बाटल्या विकल्या जात असलेल्या तक्रारी महिलांनी आरोप सभेत केला.त्यानंतर सभेत हातभट्टी दारू विक्रीविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले.मागिल काही दिवसा पूर्वीच महिलांनी दारूची दुकानं पेटवली होती.उक्कलगाव येथे गावठी दारूमुळे गेल्या 8 महिन्यात 7 जणांचे बळी गेले आहे.त्यामुळे संतप्त महिलांचा शनिवारी रुद्रावतार पहिला मिळाला.
मागिल सोमवारी पुन्हा एकाचा मृत्यू झाल्याने गावातील महिला संतप्त झाल्या.महिलांनी आक्रमक पवित्रा घेत थेट गावातील गावठी दारू विक्रीच्या दुकानांवर हल्ला चढवला.यावेळी संतप्त महिलांनी बाटली आडवी करत दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली.दरम्यान गावात कायमस्वरुपी दारूबंदी करा,अशी मागणी महिलांनी केली होती.त्यानंतर शनिवारी विशेष ग्रामसभा घेण्यात आली.नशायुक्त गोळ्याच्या विषारी दारुच्या संशयावरून गावात घटना घडल्याच्या समोर आल्यानंतर पुन्हा अवैधारित्या छुप्या मार्गाने दारूची विक्री सुरू झाल्याने शनिवारी झालेल्या तालुक्यातील उक्कलगाव येथील बोलविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये महिला आक्रमक झाल्या.
मात्र ग्रामसभेत अवैधरित्या दारुच्या विक्री करणाऱ्याना सभेत बोलवा त्यानंतर सोक्षमोक्ष होईल,असा प्रश्न असंख्य महिलांनी उपस्थित केला.विशेष म्हणजे काही गरीब महिलांना गावातील काही लोक धमक्या देत असल्याची माहिती महिलांनी प्रत्यक्षारित्या सभेतच बोलून दाखविली असून चौकातच दारुचे अड्डे टाकू अश्या खुलेआम दारु विकू असे ते म्हणतात.त्यामुळे आणखी महिला आक्रमक झाल्याच्या दिसून आल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.तसेच महिलांनी अवैधरित्या दारुची विक्री गावातून ररत्यावर दुचाक्या उभ्या करून कपडयात गुंढाळून बाटल्या दिल्या जात असल्याचा आरोप महिलानी केला.
यावेळी सभेत जलजीवन योजनेची माहिती, घरकुल योजना,स्वच्छता,इतर काही महत्वाचे विषय सभेत मंजूरी ठेवण्यात आले.तसेच सभेमध्ये गावातील दारुबंदीसाठी सुचक म्हणून सुमन रावसाहेब धनवटे यांनी दिले तर त्यास अनुमोदन उपसरपंच नितिन आबासाहेब थोरात यांनी दिले.
……