कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ):- पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी पौराणिक महत्व लाभलेल्या संवत्सरला गोदावरी नदीच्या काठावर पारंपारिक ऋषी पूजनाचा व भोजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख श्री रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्री शृंगऋषी मंदिरात महादेवाची विधीवत पूजा करण्यात आली. पंचक्रोशीतील हजारो भाविकांना यावेळी महाप्रसादाचे भोजन देण्यात आले.
संवत्सरला पौराणिक महत्व लाभलेले असून रामायण काळातील अनेक घटना व प्रसंग गोदावरीच्या काठावर घडलेले असल्याची आख्यायिका ग्रंथामधून वाचायला मिळते. श्री रामचंद्रप्रभुंच्या जन्माच्यावेळी राजा दशरथाने पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्यासाठी ज्या शृंगऋषींना आयोध्या नगरीत नेण्यात आले होते त्या शृंगऋषीचे मंदीर संवत्सर येथे गोदावरी काठावर आहे. याच मंदिराजवळ पू. रमेशगिरी महाराज यांची पूजा करण्यात येवून ११ शाळकरी मुलांना भोजन देण्यात आले. यानिमित्ताने श्री गणेश अभिषेक, वरुणदेवतेची पूजा, शृंगऋषीची पूजा, गुरुपूजन आणि ऋषीभोजनाचा कार्यक्रम पार पडला. चांगला पाऊस पडावा, शेतात धन धान्य चांगले पिकावे या मागणसाठी गेल्या शेकडो वर्षापासून संवत्सरला हा कार्यक्रम पार पडत असतो. या कार्यक्रमानंतर पाऊस पडतो असा अनुभव अनेक जुणे जाणकार सांगतात. स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांनी ही परंपरा त्यांच्या हयातीत चांगल्या प्रकारे पार पाडली.
प. पूज्य रमेशगिरीजी महाराज यांनी याप्रसंगी आशीर्वाद देताना संवत्सर परिसराचे धार्मिक महत्व विषद केले. या वेळी संवत्सर ग्रामपंचायतीचे उप सरपंच विवेक परजणे, चंद्रकांत लोखंडे, संभाजीराव भोसले, लक्ष्मणराव परजणे, पत्रकार शिवाजीराव गायकवाड यांच्याहस्ते प. पूज्य रमेशगिरीजी महाराजांचे विधीवत पूजन केले. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत लोखंडे, लक्ष्मणराव परजणे, बाळासाहेब दहे, ज्ञानदेव कासार, विजय आगवन, राजेंद्र खर्डे, राजेंद्र भोकरे, आप्पा साबळे, काका गायकवाड, सोमनाथ घेर, चंद्रकांत साबळे, राजेंद्र परजणे, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर कासार, संभाजी भोसले, भरतभाऊ ढमढेरे, नामदेवराव पावडे, भाऊसाहेब ढेपले, संभाजी भोसले, सुधाकर सोनवणे, दिनकर परजणे, बंडू फेपाळे, तुषार बारहाते, रत्नाकर काळे, कापसे, भाऊसाहेब दैने, किसन पगारे, जालीदर रोहोम, ज्ञानेश्वर आगवन, भालुशेठ भांगे, बापू तिरमखे, अशोकराव कासार, बाबुराव मैंद, सहाणे बाबा, अर्जुन तांबे, रामचंद्र निरगुडे, तसेच ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.