बेलापूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- अंगणवाडी सेविकांचे मोबाईल हॅक करून डाटा वापरून महिलांना फोन कॉल्सद्वारे पैसे उकळण्याचा प्रकार घडला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे गावामध्ये काही दिवसापूर्वीची घटना ताजी असतानाच गळनिंब येथे शितल वाघ या महिलेची आठ दिवसापूर्वीच प्रसूती होऊन मुलगा झालेला असल्याने त्या महिलेला जाटे वस्ती अंगणवाडी सोविका मदतनीस यांचे नाव सांगून तुमच्या बाळाचे सात हजार रुपये मंजूर झाल्यामुळे तुम्हाला ते फोन पे सुरू करण्यास सांगितले.
तसेच नोटिफिकेशन पाठवून तुमचे पैसे तुमच्या अकांउटला घेता येईल, अशी चलाखी करून पाच हजार रुपये फोन पे द्वारे काढून घेतल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आल्याने ग्रामीण एकच खळबळ उडाली आहेत.
विशेष म्हणजे हॅकर अन्य महिलांच्या कुटूंबातील गोपनीय माहिती चोरून नेण्याचा प्रकार घडला. काही दिवसापूर्वीच बेलापूर खुर्द येथे अंगणसेविका जया पुजारी यांचा मोबाईल हॅक करून गावातील महिलांची माहिती घेवून त्यांना फेक कॉल करण्यात आले. तुमचे अनुदान मंजूर झाल्याचे सांगून पैसे पाठवण्यासाठी फोन पे ओपन करा, अशी माहिती भरून ओटीपी मला टाका, अशी मागणी करून गावातील पाच ते सहा महिला या अमिषाला बळी पडून त्याच्या अकाउंटमधून पैसे चोरल्याचा प्रकार घडला. त्यामुळे ग्रामीण भागात असे प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले.
बारा महिलांना आले फेक कॉल
9693724772 व 9234660628 या नंबरच्या फेक कॉलद्वारे माहिती सांगून पैसे उकळण्याचा प्रकार घडत असून गळनिंब गावामध्ये दहा ते बारा महिलांना कॉल्स आल्याचे माहिती समोर आली.
अंगणवाडी सेविकांचा मोबाईल हॅक करून पैसे लुटण्याचा नवीन फंडा सुरू आहे. त्या अमिषाला बळी पडू नये.
– सुधिर नवले, सभापती – कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीरामपूर.