लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आरोग्यसाठी प्रवरेच्या सुविधांचा लाभ घेत असताना दंत आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्वांनीच आता जागृत राहण्याची गरज आहे यासाठी हे शिबिर महत्वपूर्ण ठरेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या विश्वस्त सौ सुवर्णाताई राजेंद्र विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात मोफत दंत चिकित्सा शिबीराचे उद्घाटन प्रसंगी सौ शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या. .
याप्रसंगी ट्रक वाहतूक सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी,सरपंच कल्पना मैड ,सिनेट सदस्य अनिल विखे ,भाऊसाहेब विखे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राहुल धावणे ,प्रवीण विखे,असिस्टड कमांटंड कुणाल येलमामे,डाॅ.रविंद्र मनेरीकर,डाॅ.प्रशांत विरगी,डाॅ.तंजीला बेग,डाॅ.अवेक्षा जाधव यांच्या सह ग्रामपंचायत सद्स्य व विध्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. विखे पाटील म्हणाल्या की, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रवरेत सुरु झालेल्या आरोग्यदायी सुविधामुळे ग्रामीण भागाचे आरोग्य हे चांगले राहण्यास मदत होत आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून वेळोवेळी होणारे उपक्रम हे जनतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच प्रवरेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देत असताना आज प्रवरेचा विद्यार्थी हा केंद्रीय सशस्त्र दलात असिस्टंट कमांडंट म्हणून कुणाल येलमामे यांची निवड झाली आहे ही प्रवरेच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे त्याचा आदर्श घेऊन ग्रामीण विद्यार्थ्यांनी पुढे जावे असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी सौ सुवर्णाताई विखे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी रोपांचाही वितरण करण्यात आले.