लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ): –येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शास्र विभागातील प्रा.महेश दत्तात्रय निर्मळ यांना नुकतीच डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यापीठ इंदोर यांचे कडून पी एच डी प्रदान करण्यात आली. त्यांनी डाळिंब पिकाच्या विविध रोगांचे संशोधन व यांत्रिकीकरनाचा आधार घेत नवीन धोरणाद्वारे प्रगत शेती या विषयवार संशोधन केले.
मागील 17 वर्षांपासुन ते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणुन काम करत आहेत.ते राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील रहिवाशी असून त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मा.खा.डॉ सुजय विखे पाटील,जि.प.मा.अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,प्राचार्य डॉ एस एम गुल्हाने यांच्यासह सहयोगी प्राध्यापक व परिसरातील शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.