spot_img
spot_img

शेवगावात दंगल सदृश्य परिस्थिती दगडफेकीत अनेक जखमी दुकाने, दुचाकी, चारचाकी गाड्या फोडल्या…

शेवगाव ( प्रतिनिधी):-शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काढण्यात होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेकीनंतर दोन गट एकमेकांना भिडले. काही वेळातच दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.त्यामुळे तेथील वातावरण अतिशय तणाव युक्त होते.पोलिसांच्या केलेल्या लाठीमारामुळे तणाव युक्त वातावरणात बदल घडला नाही.

महात्मा सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौकापासून बाजारपेठेत दगडांचा मारा करण्यात आला. यात कित्येक वाहनांचे नुकसान झाले. दुकानांच्या प्रथमदर्शनी भागाच्या काचा फुटल्या. त्याचबरोबर चार चाकी वाहनांची ही तोडफोड करण्यात आली. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करीत प्रचंड दगडफेक केली. पोलिसांनी जमाव पांगवल्यानंतर रस्त्यावर दगड, चपला आणि फोडलेल्या गाड्यांच्या काचांचा खच पडला होता. जमाव पांगविण्यासाठी पोलीस बळ वापर करावा लागला.ही सर्व दंगल सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. शहरातील नागरिकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने लाऊड स्पीकरद्वारे करण्यात आले. पोलीस  केलेल्या आव्हानास कुठल्या प्रकारची दाद देत नव्हते . पोलीस प्रशासन हतबल झाले होते .

शेवगाव तालुका हा नेहमी शांत आहे असे समजले जाते.दगडफेक आणि मारहाणीत जखमी झालेल्या अनेकांना विविध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशिरा अतिरिक्त फौजफाटा शहरात मागविण्यात आला होता. पोलिसांची वेगवेगळी पथके करून आरोपींची धरपकड सुरू केली होती. शेवगाव मध्ये उद्भवलेली परिस्थिती हाताच्या बाहेर जाते काय असे वाटत आहे. पोलीस प्रशासनाकडून अधिक प्रमाणात फौज फाटा बोलण्यात आला आहे. दंगल सदृश्य  परिस्थिती कशामुळे घडली आहे याचा शोध पोलीस घेत आहे .
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!