spot_img
spot_img

नेवासा फाटा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

नेवासा फाटा( प्रतिनिधी):- नेवासा फाटा येथे जिल्हा मराठा पतसंस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी पतसंस्थेचे संचालक शिवश्री संभाजी मते यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी संचालक संभाजी मते यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्या विषयी माहिती देताना म्हटले की छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य असामान्य होते. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत ग्रंथ लिहिला. मोगलांशी त्यांनी अत्यंत धैर्याने लढा दिला. छत्रपती संभाजी महाराज हे यशस्वी राजे आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या कारकीर्द मध्ये अनेक पराक्रम गाजवून खूप मोठे यश मिळवले. म्हणूनच अशा या धर्मवीर संभाजी राजेंची जयंती सबंध भारतात मोठ्या थाटामाटा साजरी करण्यात यावी असे भाषणाच्या शेवटी शिवश्री संभाजी मते यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी शिवश्री रावसाहेब घुमरे, लक्ष्मणराव गारुळे, पंढरीनाथ म्हस्के, रावसाहेब चौधरी, अशोक साळुंके, प्राध्यापक मुरलीधर कराळे, निलेश जाधव ,संतोष पारखे, सूर्यकांत कडू, नितीन अडसुरे आदी उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!