8.1 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील रस्त्यांसाठी 17 कोटी 59 लाख रुपयांचा निधी तालुक्यातील 6 रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सहा रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 17 कोटी 58 लाख 91 हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. तालुका विस्ताराने मोठा असूनही प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर विविध शासकीय योजना च्या माध्यमातून रस्ते आरोग्य पाणी यांसह नागरिकांना मूलभूत सुख सुविधा निर्माण करून दिल्या आहेत यामुळे संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करत आहे.

नव्याने आमदार थोरात यांनी तालुक्यातील विविध रस्त्यांकरता 14 जुलै 2023 रोजी दिलेल्या पत्रानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत डिग्रस ते दरेवाडी हा 2.10 किलोमीटर लांबीचा रस्त्या करतात 2 कोटी 43 लाख 67 हजार रुपयांच्या निधी, तर पारेगाव बुद्रुक काकडवाडी पालखी रस्त्या करता दोन कोटी 73 लाख 22 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

याचबरोबर धांदरफळ ते करमाळा या रस्त्या करता 2 कोटी 73 लाख 22 हजार रुपये, राजापूर ते खतोडे वस्ती या रस्त्या करता 3 कोटी 50 लाख 48 हजार रुपये, जवळेकडलग ते वडगाव लांडगा या रस्त्या करता 3 कोटी 15 लाख 89 हजार रुपये, शेंडेवाडी ते हिवरगाव पठार या पठार भागातील 3.30 km रस्त्या करता 3 कोटी 2 लाख 43 हजार रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. असा एकूण सहा रस्त्यांकरता 17 कोटी 58 लाख 91 हजार रुपयांचा एकूण निधी मंजूर झाला आहे.

नुकत्याच संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पारेगाव बुद्रुक काकडवाडी तळेगाव या मार्गे गेली या रस्त्याच्या मजबुती व डांबरी करण्याकरता नागरिकांनी मागणी केली आमदार थोरात यांनी तातडीने याकरता निधी मंजूर घेतला असून हा पालखी मार्गे यातून होणार आहे.

या निधीमधून या सर्व रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण होणार आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मंजूर होणार आहे.

हा निधी मंजूर केल्याबद्दल राजापूर ,जवळे कडलग, वडगाव लांडगा ,शेंडेवाडी, हिवरगाव पठार, डीग्रस, दरेवाडी, पारेगाव बुद्रुक, काकडवाडी, धांदरफळ या गावातील नागरिकांनी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!