राहाता (तालुका प्रतिनिधी)- श्री गणेश सहकारी साखर कारखाना चालवितांना राजकिय जोडे बाजुला ठेवून तो आपण चालविला. कारखाना चांगला चालण्यासाठी गणेश च्या निवडणूकीत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
गणेश कारखाना चांगला चालण्यासाठी निवडणूकीत सर्वांनी सहकार्य करावे- खासदार डॉ. सुजय विखे पाटील
श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर संपुर्ण गणेश परिसरातील सभासदांच्या बैठकीत खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के, गणेश चे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, माजी संचालक मोहनराव सदाफळ, भागुनाथ गाडेकर, भाऊसाहेब जेजुरकर, अभय शेळके, शिवाजी गोंदकर, दिगंबर कोते, विजय जगताप, डॉ. धनंजय धनवटे, गंगाधर चौधरी, साहेबराव निधाने, रावसाहेब देशमुख, कैलास सदाफळ, दिपक तुरकणे, दिपक रोहोम, ज्ञानदेव गोंदकर, ज्ञानदेव चोळके, वाल्मिकराव गोर्डे, संदिप लहारे, भाउसाहेब शेळके, भाऊसाहेब घोरपडे, पी. डी. गमे, तबाजी घोरपडे, बाळासाहेब गमे, राजेंद्र पठारे, बाळासाहेब गाडेकर, बाळासाहेब डांगे, संतोष गोर्डे यांचेसह परिसरातुन आलेले सभासद, कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, राजकिय प्रक्रिया म्हणुन काही लोक या परिसरात येतात, शब्द देतील! निघुन जातील. पुन्हा निवडणूक आली की, शब्द देतील. या परिसरातील जे त्यांच्यासाठी पळाले ते यांच्या मुलाच्या लग्नाला तरी येतात का? नामदार विखे पाटील यांनी मात्र त्यांचे एकतरी काम केलेले असेल. त्यामुळे बाहेरच्यांवर विश्वास ठेवू नका. या भागात येवुन भाषण करुन गेले त्यांची पात्रता काय? हे आपण आताच सांगणार नाही. निवडणूकीच्या प्रचारात समाचार घेवु. संघर्ष हा विखे घराण्याला नव्याने नाही. बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार होती पण ती काहिंनी लावली.
कोणतीही संस्था बंद पाडण्यासाठी आम्ही ताब्यात घेत नाही. ती चांगली चालली पाहिजे. गणेश कारखाना चालविण्यासाठी, कामगारांचे कुटूंब चालण्यासाठी, शेतकर्यांचे कुटूंब चालण्यासाठी ना. विखे पाटील यांनी मोठी रक्कम गणेश मध्ये गुंतविली आहे. तरीही चेहेर्यावर दु:ख ठेवले नाही. आम्हाला पैशाचा मोह नाही. आमचा प्रपंच उध्दवस्त झाला तरी चालेल पण आमच्या कार्यकर्त्यांचा प्रपंच उध्दवस्त होवु देणार नाही.
गणेश च्या निवडणूकीची प्रक्रिया सोमवार पासुन सुरु होणार आहे. संघटनेने सांगितल्याशिवाय कार्यकर्त्यांनी अर्ज भरु नये. नियोजनबध्द कार्यक्रमात कुणी संघटनेचा कट्टर कार्यकर्ता विसरायला नको, संघटनेच्या सुचनेनुसारच कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल करावेत. बाजार समितीत राष्ट्रवादीत होते पण आपल्या संघटनेत आले त्यांना आपण संधी दिली.हे करतांना आपल्याला संघटनेला कव्हर करावे लागते. सर्वांना सामावुन घेवून समाजाचे प्रश्न कसे सुटतील हे आपण पाहातो.
याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के म्हणाले, ना. विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गणेश चांगला चालावा म्हणुन त्याची क्षमता वाढविली. गणेशला तोट्याचा शाप आहे. गणेश च्या माध्यमातुन काही जण या भागात राजकारण करतील. त्यामुळे चांगल्या कामाला गालबोट लागु नये.
गणेश चे माजी संचालक मोहनराव सदाफळ म्हणाले, गणेश च्या निवडणुकीत राजकारण न आणता ती बिनविरोध करावी. बाहेरचे लोक येतील खोटे अश्वासन देतील. गणेश ची निवडणूक लढविणे म्हणजे गोत्यात पाय असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी गंगाधर चौधरी यांचेही भाषण झाले. प्रास्तविक गणेशचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ यांनी केले. ते म्हणाले, ना. विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील यांनी गणेशवर 30 ते 35 लाख रुपये खर्च केले. कारखान्याची क्षमता 1700 वरुन 3500 वर नेली. आसवानी प्रकल्प सुरु केला. बाहेरुन उस आणुन कारखाना चालविला. शेवटी आभार उपाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी मानले.



