8.1 C
New York
Sunday, March 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ. थोरातांमुळे महिलांना उद्योग व्यवसायासाठी बळ – दुर्गाताई तांबे; ‘एकविरा’कडून १२० महिलांना बेसिक व ॲडव्हान्स डिझाईनचे प्रशिक्षण

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, यासाठी अविरतपणे काम सुरू असून कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुक्यातील महिलांकरता मोफत शिवणकामाचे बेसिक व ऍडव्हान्स प्रशिक्षण सुरू झाले असून यामध्ये १२० महिलांनी सहभाग घेतला आहे.

यशोधन कार्यालय येथे या एक महिन्याच्या बेसिक व ॲडव्हान्स प्रशिक्षण कोर्सचा शुभारंभ नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते झाला. यावेळी समवेत, मुख्याधिकारी श्रीराम कुर्हे, प्रशिक्षक शिला करंजेकर, सुजाता बोबडे, सुयोग मशिनरीचे निलेश बारड, यांच्यासह एकविराच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.

या एक महिन्याच्या कोर्स मधून महिलांना शिवणकामाचे बेसिक ट्रेनिंग याचबरोबर ऍडव्हान्स प्रशिक्षण, नवनवीन डिझाईन, फॅशन डिझाईन याबाबतचे दररोज दोन तास प्रशिक्षण दिले जाणार असून यामध्ये 120 महिलांनी सहभाग घेतला आहे.

सौ. तांबे म्हणाले की, डॉ. थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुक्यातील महिलांच्या उद्योग व व्यवसाय यासाठी प्रोत्साहन मिळावे. याकरता विविध उपक्रम राबवले आहेत. यापूर्वीही केक बनवणे, धूप, अगरबत्ती, मसाले पदार्थ, पापड लोणचे या घरगुती उद्योगांबरोबरच तालुक्यातील महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंना मेट्रो शहरांमध्ये मागणी वाढावी याकरता त्यांचे प्रोफेशनल फोटो सेशन व ब्रँडिंग करण्यात आले.यमुळे या ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादित मालांना मुंबई पुणे शहरासारख्या मेट्रो शहरांमधून मोठी मागणी होऊ लागली आहे.

आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावातील वाडी वस्त्र विकासाच्या योजना राबवल्या जात आहे. एकविराच्या वतीने महिला सबलीकरणाचा मोठा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामधून जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

निलेश बारड म्हणाले की, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एकवीरा फाउंडेशनने सुरू केलेल्या हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून मशिनरीची रिपेरिंग, नवनवीन तंत्रज्ञानासह सहावारी व नऊवारी डिझाईनचे एक दिवसाचे प्रशिक्षणही मोफत देण्यात येणार आहे.

यावेळी सर्व महिलांनी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल डॉ. थोरात यांचे अभिनंदन केले असून यामुळे आम्हा सर्व महिलांना ग्रामीण भागामध्ये घरगुती छोटा व्यवसाय मोठ्या प्रोत्साहन मिळाले असल्याचे सांगितले आहे.

महिलांना सक्षम बनवण्यासाठी काम- डॉ. थोरात

 

ग्रामीण व शहरी भागातील महिलांमध्ये अनेक कलागुण असून त्यांना योग्य मार्गदर्शन व संधी निर्माण करून दिल्याने त्यांना घरगुती उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. यामधून त्या कुटुंबाला आर्थिक मदत होण्यास हातभार लागणार आहे. यासाठी एकविरा फाउंडेशनच्यावतीने काम सुरू असल्याचे डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!