संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्शवत ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024 – 25 या गाळप हंगामाच्या पहिल्या मिल रोलर चे पूजन राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष व कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांच्या हस्ते झाले.
साखर कारखान्यात झालेल्या या रोलर पूजन कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक रमेश गुंजाळ मीनानाथ वरपे, भास्करराव आरोटे, संभाजी वाकचौरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, अशोक मुटकुळे ,नवनाथ गडाख ,शरद गुंजाळ आदींसह सर्व विभाग प्रमुख व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रतापराव ओहोळ म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी प्रतिकूल परिस्थितीतून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया घातला. हा समृद्ध वारसा जपताना काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील सहकाराने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करत दिशा देण्याचे काम केले आहे.संगमनेरचा सहकार हा राज्याला दिशादर्शक असून या कारखान्यामुळे व सहकारी संस्थांमुळे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. येथील चांगल्या कामाला परमेश्वराचे आशीर्वाद कायम लागले आहे. मागील वर्षी कारखान्याने 10 लाख 92 हजार मे. टनाचे उच्चांक गाळप केले आहे.असून नव्या हंगामामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप व्हावे यासाठी मेंटेनेस ची सर्व काम अंतिम टप्प्यात आली आहेत. यामध्ये कारखान्याचे कार्यकारी संचालक, सर्व विभागांचे विभाग प्रमुख,अधिकारी कर्मचारी यांची ही कठोर मेहनत आहे. शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेताना एकरी उत्पादन वाढले पाहिजे यासाठी शेतकी विभाग काम करत असल्याचे ते म्हणाले.
तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, कारखान्याचे सर्व ओव्हर ओईलींग चे काम पूर्ण होत असून 2024- 25 मध्ये येणाऱ्या उसाचे पूर्ण क्षमतेने गाळप करण्यासाठी कारखाना सज्ज झाला असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.



                                    