spot_img
spot_img

पोलीस पाटलांनी समाजहितासाठी काम करावे – अशोक कानडे      यशोधन संपर्क कार्यालयात पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा): – पोलीस पाटील हे समाजाचा आरसा असून पोलीस पाटलांनी समाजहितासाठी काम करावे. आमदार लहू कानडे यांच्या माध्यमातून पोलीस पाटलांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे यांनी केले.

आमदार लहू कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात श्रीरामपूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. कानडे बोलत होते

यावेळी पोलीस पाटील संघटनेच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी मधुकर बनसोडे, उपाध्यक्षपदी उमेश बारहाते, सचिवपदी संतोष भांड, संपर्कप्रमुख युवराज जोशी व जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून दिलीप हळनोर व दत्तात्रय मुठे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल या नूतन पदाधिकाऱ्यांना यशोधन कार्यालयात अशोक (नाना) कानडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

श्री कानडे म्हणाले की, समाजात काम करत असताना पोलीस पाटील महत्त्वाचा घटक आहे,. पोलीस पाटील म्हणून त्यांना समाजात मानाचे स्थान आहे. पोलीस पाटील समाजाचे प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. संघटनेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडतात. पुढील काळात पोलीस पाटलांचे प्रश्न आमदार लहू कानडे यांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. पोलीस पाटलांनी समाजहितासाठी सातत्याने काम करत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष मधुकर बनसोडे, उपाध्यक्ष उमेश बारहाते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सचिन जगताप, राजेंद्र औताडे, रवींद्र आमले, हरिभाऊ बनसोडे, सरपंच दिनकर बनसोडे, आशिष शिंदे, अभिजित मुसामाडे, प्रतिक कांबळे, कल्पेश माने, निखील कांबळे, पुंडलिक दिवटे, दत्तात्रय खडके, समीर शेख, पोलीस पाटील धनंजय खरात, विनोद पवार, श्री. बारसे यांच्यासह पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी सुनील नवले यांनी आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!