spot_img
spot_img

सभापती पद ठरले कळीचे कारण, त्यामुळे विखे मुरकुटे ससाणे युतीला तडा

श्रीरामपूर (प्रतिनिधी ):– श्रीरामपूर बाजार समितीच्या सभापती पदावरून महिन्यापूर्वी एकत्र आलेले विखे -मुरकुटे- ससाणे युतीला तडा गेला आहे.

 याला निमित्त ठरले आहे श्रीरामपूर बाजार समिती सभापती व उपसभापती निवड सभापती निवडी वेळी विखे व ससाणे गटाने परस्पर विरोधी उमेदवार उभा केल्याने त्यांच्यामध्ये आता पुन्हा दरी निर्माण झाली आहे. मुरकुटे हेही या सभापती पदाच्या निवडीपासून अलिप्त राहणे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
 या निवडणुकीच्या सुरुवातीला जागावाटपून थोडीफार धुसफूस झाल्यानंतर तरी पण एकत्र लढून १८ पैकी १७ जागा या युतीने बळकवल्या होत्या. परंतु सभापती पद मुख्य कळीचा मुद्दा ठरला आहे त्यामुळे विखे ससाणे मुरकुटे या युतीला तडा गेला असून या गोष्टीची शहरांमध्ये चर्चा चा विषय करत आहे. 
श्रीरामपूर मध्ये विखे गटाला मानणारी संख्या जास्त आहे व त्यांची कार्यकर्ते सुद्धा सभापती पदासाठी आग्रही होते. परंतु ससाणे गट व विखे गट यांच्यामध्ये सभापती पदावरून वाद वाढत गेला. या युतीमध्ये कुठलाही प्रकारची वाद ना व्हावं याकरिता भानुदास मुरकुटे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यानंतर  ससाणे गटाकडून सुधीर नवले तर विखे गटाकडून गिरीधर आसने यांनी सभापती पदासाठी उमेदवारीचे अर्ज दाखल केले .
 यावेळी मतदान घेण्यात आले सुरुवातीला आसने  यांच्या बाजूने 8 तर नवले यांच्या बाजूने 6 संचालक असल्याचे सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्ष हात वर करून मतदान घेण्यात आलेत तेव्हा जितेंद्र गादिया यांनी मतदान दिल्याचे समजले. त्यामुळे विखे व ससाणे गटाचे उमेदवारांना समसमान मत पडल्यामुळे ईश्वर चिट्ठी काढण्याचे ठरवले. त्यावेळी सभापती पदी सुधीर नवले यांच्या नावाचे कौल मिळालं. 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!