spot_img
spot_img

माझी लाडकी बहीण योजनेतून महीलांचे सक्षमीकरणास मदत-सौ. शालिनीताई विखे पाटील  

लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्वकांक्षी असून महिलांच्या सक्षमीकरणा बरोबरच महिलांचे स्वावलंबन, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी मोठी मदत होईल. या योजनेत पात्र महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

शिर्डी मतदार संघातील लोणी बुद्रुक आणि खुर्द येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे,लोणी बु च्या सरपंच कल्पना मैड,अशोक धावणे, सिनेट सदस्य अनिल विखे, राहूल धावणे, दिलीप विखे, भाऊसाहेब विखे, किशोर धावणे,दादासाहेब घोगरे,संजय आहेर,भारत घोगरे, बाळासाहेब आहेर,शरद आहेर ,रामनाथ आहेर,राहूल घोगरे,भारत घोगरे, सचिन आहेर, विजय मापारी,  यांच्यासह दोन्ही गावचे ग्रामस्थ व अंगणवाडी सेविका व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ. विखे पाटील म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेसाठी महायुती सरकारच्या अनेक योजना आहेत. शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनतेसाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत, बचत गटांसाठी विशेष योजना यासह मुलींना मोफत शिक्षण या योजनां बरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत दरमहा पंधराशे रुपये या योजनेत सहभागी होणार्या पात्र महिलांना मिळणार आहे.शिर्डी मतदार संघांमध्ये योजना घराघरात पोहोचण्यासाठी चांगले नियोजन करा असे आवाहन सौ.विखे पाटील यांनी केले.

युती सरकारच्या योजनांवर टिका करणारेच महाविकास आघाडीचे नेतेच आता अर्ज भरण्यासाठी सेवा सुविधा देत असले तरी महायुतीचे सरकार हे आपले सरकार असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.शिर्डी मतदारसंघात मंत्री विखे पाटील आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने गावोगावी नियोजन करण्यात आले असून याचा लाभ घेऊन प्रत्येक पात्र महिलांनी सहभागी व्हावी असे आवाहन केले .प्रारंभी राहाता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी या योजनेची माहिती देतांना कागदपत्रे पात्रता आणि निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!