spot_img
spot_img

प्रवरेच्या चिचोली येथील औषधनिर्माण महाविद्यालयातील तीन मुलींची गूणवत्ता अधिकारी पदावर निवड

लोणी दि.१३( प्रतिनिधी):-लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महीला औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालातील मोहू- चिंचाली (ता.सिन्नर) येथील तीन मुलींची गुणवत्ता चाचणी अधिकारी म्हणून मेकलॉईड्स फार्मासुटीकल्स, वापी येथे निवड झाल्याची माहीती प्राचार्या डाॅ.चारुशिला भंगाळे यांनी दिली.
   

ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण देतांनाच त्यांना रोजगार उपलब्धी यांवर संस्थेचा नेहमीच भर राहीला आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहू चिंचोली येथील महीला फार्मसी औषधनिर्माण महाविद्यालयातील कु.आयनी देहराज, कु. निकीता खापरे, कु. समृद्धी भांगरे या चौथ्या वर्षातील मुलीची मेकलॉईडस फार्मा सुटिकल्स वापी या कंपनी मध्ये गुणवत्ता अधिकारी पदावर निवड झाली आहे. संस्थेबरोबरच महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट विभागामार्फत वेळोवेळी विद्यार्थ्याना प्रशिक्षणे,प्रक्षेत्र भेटी कार्यशाळा व्यक्ती महत्व विकास, मुलाखत तंत्र या बरोबरचं माजी विद्यार्थी कडून नव्या तंञज्ञान माहीती दिली जात असल्याचे प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. विकास कुटे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ.सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुश्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, प्राचार्य डाॅ.चारुशिला भंगाळे यांनी अभिनंदन केले.
   मी ग्रामीण भागातील शेतकरी कुंटुबातील आहे.योग्य मार्गदर्शन, प्रक्षेञ भेटी,विविध तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.ग्रामीण भागात असतांना सर्वसुविधा मिळाल्याने यश संपादन करु शकले– कु.समध्दी भांगरे
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!