spot_img
spot_img

श्रीरामपूर बंदला कॉंग्रेस पक्षाचा पाठींबा – अरुण पा. नाईक

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – अहिल्यानगरचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने उद्या रविवार दि. १४ जुलै रोजी पुकारलेल्या श्रीरामपूर बंद मध्ये व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी कष्टकरी नागरिकांनी स्वयंस्पुर्तीने सहभागी होवून बंद यशस्वी करावा. असे आवाहन जिल्हाकार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, नगरसेवक अशोक ( नाना ) कानडे, जिल्हाउपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी केले आहे.

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटलेले कि, श्रीरामपूर जिल्हा व्हावा हि रास्त मागणी असून भौगोलिक दृष्ट्या श्रीरामपूर हे लगतच्या तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे जिल्ह्याचे मुख्यालय होण्याच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

तसेच श्रीरामपूर जिल्ह्याचे मुख्यालय हे उत्तरेतील सर्व तालुक्यांना कामकाजाच्या दृष्टीने सोयीचे असतानाही मागील ४० वर्षापासूनच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे श्रीरामपूरसह उत्तरेतील तालुक्यांच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी कॉंग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडेसाहेब यांनी वेळोवेळी अधिवेशनात विषय उपस्थित करून श्रीरामपूर जिल्हाचे मुख्यालय व्हावे हि मागणी लावून धरलेली आहे. यापूर्वीही कॉग्रेस पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन केलेले आहे. आमदार कानडे साहेब यांनी सहा तालुक्यासाठी नगररचना कार्यालय श्रीरामपूर शहरात मंजूर करून घेतले.

शहराची हद्द वाढविण्यासाठी नगर पालिकेस शेती महामंडळाची जागा उपलब्ध आहे. श्रीरामपूर शहरात रेल्वे मार्ग, आर. टी. ओ. कार्यालय, एम. आय. डी. सी., शहरात प्रवेश करणारे रस्ते चौपदरीकरण, एम.आय.डी. सी. मध्ये हायपावर सबस्टेशन उभारणी, येथील ग्रामीण रूग्णालयाच्या दर्जात वाढ करून त्याचे रुपांतर उपजिल्हा रूग्णालयात अशा जिल्ह्याच्या मुख्यालयासाठी आवश्यक त्या सुविधा येथे उपलब्ध आहेत.

श्रीरामपूर जिल्हाचे मुख्यालय झाल्यास येथील व्यापार, उद्योग, शेती विकसित होण्यास मोठा हातभार लागेल. यामुळे येथील अर्थकारणास गती मिळून सामान्याचे जीवनमान विकसित होण्यास मद्दत होणार आहे. शहरातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी, विविध संघटना याच्याशीही या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आहे. या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून, श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी पुकारलेल्या श्रीरामपूर बंदला आमदार कानडे साहेब यांच्या सोबत चर्चा करून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिलेला आहे.

श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने श्रीरामपूर जिल्हा व्हावा यामागणी साठी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक यशोधन कार्यालयात बोलावली होती. या प्रसंगी कॉंग्रस पक्षाचे जिल्हाकार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले कि, श्रीरामपूर जिल्हा व्हावा हा श्रीरामपूरकरांसाठी अत्यंत जीवाळ्याचा प्रश्न असून श्रीरामपूर जिल्हा झाल्यास श्रीरामपूर तालुक्याच्या आर्थिक विकासात व वैभव नक्कीच भर पडणार असून. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. अनेक दिवसाच्या या प्रलंबित विषयाकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. हा येथील जनतेच्या तीव्र भावनाचा अनादरच आहे. या प्रश्नावर कॉंग्रस पक्ष गट तटाचा विचार न करता या पुढे सर्व आंदोलनात खांद्याला खांदा लावून सहभागी असेल. सर्व व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी, नागरिकांनी स्वयंस्पुर्तीने उत्सपुर्तपणे श्रीरामपूर बंदमध्ये सहभागी व्हावे. व श्रीरामपूर जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे यासाठी बंद यशस्वी करावा असे आवाहन श्रीरामपूर तालुका कॉंग्रेसपक्षाच्या वतीने सचिन गुजर, अरुण पा. नाईक, अशोक ( नाना ) कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!