spot_img
spot_img

वृंदावन कृषीतील बुद्धिबळाचा पुणे संघ विजेता

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- वृंदावन कृषी महाविद्यालयात पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कृषी महाविद्यालय, पुणेच्या मुलां- मुलींनी अजिंक्यपद पटकावले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित वृंदावन कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चव्हाणयांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव राहुल गुंजाळ होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, कॉलेजचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर, पुणे कृषी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. अभिजीत नलावडे उपस्थित होते.

या स्पर्धेत राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्र येणाऱ्या दहा जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयातील 360 हून अधिक विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. दोन दिवस सात फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयातील मुला मुलींनी आपले वर्चस्व गाजवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. निवड समिती सदस्य म्हणून एस. टी. काशीद, प्रा. आर. एस. शेख, प्रा. ए. पी. खोंडे, प्रा. एम. बी. कुंभार यांनी काम पाहिले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:

मुले: प्रथम क्रमांक – कृषी महाविद्यालय पुणे, द्वितीय क्रमांक शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती, तृतीय क्रमांक विभागून के के वाघ कृषी महाविद्यालय नाशिक व आर सी एस एम कृषी महाविद्यालय कोल्हापूर.

मुली: प्रथम क्रमांक कृषी महाविद्यालय पुणे, द्वितीय क्रमांक कृषी महाविद्यालय कोल्हापूर आणि के के वाघ कृषी महाविद्यालय नाशिक, तृतीय क्रमांक विभागून कृषी महाविद्यालय धुळे आणि डी वाय पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!