spot_img
spot_img

प्रवरा कन्या मंदीरच्या मुलींनी ई.व्ही.एम.मशीनव्दारे घेतला शालेय मंत्रिमंडळ निवडीचा आगळावेगळा अनुभव …

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींच्या विद्यालयाला सातत्याने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील संस्थेच्या संचालिका सौ. लिलावती सरोदे यांचे मार्गदर्शन लाभत असते त्यामुळे शाळेत विविध शालेय उपक्रम राबवले जातात. त्याचे फलित म्हणून सन २०२४-२५ मध्ये मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा” या उपक्रमात पुणे विभागात “प्रथम क्रमांक” पटकावून २१ लाखाच्या बक्षीसास शाळा पात्र ठरली.

यावर्षी नवीन शालेय मंत्रीमंडळाची विविध पदांसाठीची निवडणूक पूर्णपणे भारतीय लोकशाहीची आदर्श मूल्ये व तत्वांची ओळख व्हावी यासाठी प्रवरा कन्या मंदीरच्या मुलींनी ई.व्ही.एम.मशीनदवारे घेतला शालेय मंत्रिमंडळ निवडीचा आगळावेगळा अनुभव घेतला.

निवडणूक प्रमुख अधिकारी व प्राचार्या सौ भारती कुमकर , क्रीडा शिक्षिका सौ. विद्या घोरपडे यांनी सर्व नियम व अटीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आणि त्यांना दोन दिवस प्रचार करण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यांना प्रत्येकी चिन्हे आणि पदे देऊन लोकशाही मार्गाने ही निवडणूक घेण्यात आली. अतिशय आनंदादायी व उल्हसित वातावरणात ई व्ही एम मशीन व अँप चा वापर करून मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया समजावून दिली.

विद्यालयाच्या विद्यार्थ्यींनीना शालेय मंत्रीमंडळ निवडणूक निकोप लोकशाहीचा वापर करून प्रत्यक्ष मतदानाने आपल्या आवडीचे विद्यार्थी प्रतिनीधी निवडता यावे यासाठी शिक्षक,शिक्षिकांनी चोख व्यवस्था ठेवली. मतदारांचे दोन गट करून वेगवेगळ्या दहा मोबाईलवर “अँप” डाउनलोड केले त्यामध्ये इयत्ता ५ वी ते १० वी च्या एकूण १३९५ मुलींनी प्रथमच प्रत्यक्ष मशीनवर मतदान करून आपल्याला वयाच्या १८ व्या वर्षी मिळणारा भारतीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी कसे निवडतात हा अनुभव या निवडणुकीत घेता आला. विद्यालयीन निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवून मुख्यमंत्री पदी – कु संस्कृती गायके इयत्ता दहावीची विद्यार्थ्यींनी निवडून आली ,तर उपमुख्यमंत्री- कु श्रद्धा म्हस्के इयत्ता नववीची निवड झाली. आरोग्यमंत्री- कु.प्रतिक्षा आमटे तर उपपदी – कु श्रद्धा विधाटे , शिस्तमंत्री- कु शरयू घोगरे ,उपपदी- कु वैष्णवी चेमटे, सांस्कृतिकमंत्री- कु.अद्वैता गावंडे,उप- कु.अंजली पवार, तर महत्वाचा समजला जाणारा विभाग क्रीडा की ज्यामध्ये स्वतः उमेदवार राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेला असावा ही अट जिने दोनदा पूर्ण केली

अशी विद्यार्थीनी क्रिडामंत्रीपदी – कु ज्ञानेश्वरी रिंधे हिची निवड झाली, तर उपमंत्रीपदी- कु.पायल बोंबाळे ही निवडून आली, निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या सौ भारती कुमकर यांनी सर्व विद्यार्थ्यीनींना लोकशाही प्रणाली व आपण निवडलेले प्रतिनीधीचे कर्तव्य यांची जाणीव करून दिली, त्यांनी विद्यार्थी हिताचे सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे , निवडून आलेल्या प्रतिनिधींनी शालेय व्यवस्थापन, शिक्षक ,विद्यार्थीनी यांच्यामध्ये दुवा बनून शालेय वातावरण शिस्तबद्ध राखावे. शिस्त अबाधीत राहण्यासाठी सतत प्रयत्न केले जावेत, शालेय गुणवत्तापूर्ण शिक्षण घडवून आणण्यासाठी वेळोवेळी मदत करणे अशाप्रकारे वेगवेगळ्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. तसेच त्यांना पदाच्या गोपनीयतेची शपथ देत अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यवेक्षक बी पी चिंधे , क्रीडा शिक्षिका सौ विद्या घोरपडे, सौ कल्पना कडू यांनी विद्यार्थीनी शिस्तबद्ध मतदान करतील अशी व्यवस्था ठेवली. निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षपणे ई. व्ही. एम. मशीनचा आणि अँपचा प्रभावी वापर व्हावा म्हणुन तसेच त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी रवींद्र डगळे , योगेश दिघे , जितेंद्र बोरा , अनिल लोखंडे , आर एम. लबडे,सुरेश गोडगे,स्वाती निर्मळ,सुर्वणा पुलाटे यांनी प्रयत्न केले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!