सिंधु छाया कॅम्पस चिचोली येथील डॉ राहुल भंडारी लिखित हेल्थ इन्शुरन्स पुस्तकाचे विमोचन प्रसंगी डॉ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकार डॉ. शिवानंद हिरेमठ, फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय तांबे, डॉ. चारुशिला भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य विमा ही आज प्रत्येकांची गरज आहे – डाॅ.सुश्मिताताई विखे पाटील
लोणी दि.१२ (प्रतिनिधी):-आरोग्य विमा ही आज प्रत्येकांची गरज आहे. या विमा योजनेची जागृती वाढविण्यासाठी आणि विमा योजनेच्या परिपूर्ण माहीतीसाठी हेल्थ इन्शुरन्स हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुश्मिताताई विखे पाटील यांनी केले.
यावेळी या पुस्तकाचे लेखक डॉ. राहुल भंडारी यांनी आरोग्य विमा पध्दत मिळणारे फायदे आदीविषयी माहीती दिली.



