ठाणे (प्रतिनिधी) :- काल दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथा पालथ मिळाली. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर त्यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा असल्याचं मत व्यक्त केलं. ते शुक्रवारी (१२ मे) ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा संभ्रमात टाकणारा आहे – राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याप्रकरणी मला न्यायालय किंवा पोलिसांकडून नोटीस येतात. त्यातील त्यांची भाषा वाचल्यावर आपल्याला सोडलंय की अटक केली हेच कळत नाही. इतकी ती भाषा गुंतागुंतीची असते. याचबरोबर राज ठाकरे यांनी आपल्या भाऊ उद्धव ठाकरे यांना चिमटे काढले. जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आज त्या स्थितीला ते पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असते.
सर्वोच्च न्यायालयाने निकालात अनेक गोष्टी सांगितल्या. प्रोसेस चुकली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधीमंडळाचा गट योग्य ठरणार नाही. निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय त्याचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित करताना राज ठाकरे म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे. राज ठाकरे यांच्या मते यापुढे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अतिशय आणीबाणीची राहील.



