प्रवरानगर (जनता आज वृत्तसेवा):- विठुराया आणिआषाढीचे महत्व प्रवरा परिसर व परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांना समजावे या उद्देशाने काल मंगळवारी विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. प्रवरा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय सोहळा साजरा करण्यात आला.
सोहळ्याची सुरुवात विठ्ठल रुख्मिणी यांच्या आरती ने करण्यात आली. शाळेचे डॉ बी बी अंबाडे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव माननीय श्री भारत घोगरे पाटील शाळेचे उपप्राचार्य श्री के टी अडसूळ माध्यमिक विभाग पर्यवेक्षिका सौ एम एस जगधने प्रार्थमिक विभाग प्रमुख सौ एस एस रत्नपारखी ज्येष्ठ शिक्षक श्री जी एफ मनियार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन , पालखी पूजन ,व विठ्ठलाची आरती झाली.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी रिंगण व पाऊली चे सादरीकरण केले. विठ्ठल रखुमाई वारकरी अशा वेगवेगळ्या पोशाखातील विद्यार्थ्यांनी शालेय प्रांगणात काढलेली दिंडी आणि माऊली माऊलीचा जयघोष यामुळे चैतन्य अवतरले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भजने सादर केली. प्रमुख पाहुणे श्री भारत घोगरे पाटील यांनी वारीचे महत्त्व व विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणी परिसराला बनवलेल्या शिक्षणाच्या पंढरीचे महत्त्व आपल्या भाषणात विशद केले. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते .या सोहळ्याची सांगता सर्व चिमुकल्या वारकऱ्यांसोबत पावली खेळून करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री गुलजार मनियार, श्री वाल्हेकर सर श्री साळवे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री एम बी अंत्रे सर यांनी केले.



