25 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

कालवडीचा पाडला बिबट्याने फडशा उक्कलगाव येथील घटना

बेलापूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोल्हार – बेलापूर ररत्यावरील उक्कलगाव शिवारात मंगळवारी (दि.१६) च्या मध्यरात्री सुमाराला बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त झाली. बिबट्याचा गेल्या काही दिवसांपासून या शिवारात धुमाकूळ सुरू असल्याची माहिती शेतकर्‍यानी दिली. श्री.थोरात वस्तीवर धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने कालवडीवर हल्ला चढविला.

कोल्हार – बेलापूर रस्त्यावरील गळनिब शिवारात सुरेश विश्राम थोरात यांचे शेत व वस्ती आहे.श्री.थोरात यांच्या वस्तीवर दुभती जनावरे बांधलेली होती.मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमाराला बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवत फस्त केली.

मात्र रात्रीला गायाच्या हंबरड्यामुळे श्री.थोरात कुंटूबिय जागे झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.तोपर्यंत बिबट्याने कालवड मकाच्या शेतात ओरडत नेत ठार केली.याबाबत बुधवारी सकाळी वनविभागास घटनेची माहिती दिल्यानंतर वनपाल अक्षय बडे घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.त्यामुळे बिबट्याने कालवड ठार केल्यामुळे श्री.थोरात यांचे मोठे नुकसान झाले.आधीच दुधाला भाव नसल्याने त्यातच बिबटे पाळीव प्राण्यावर हल्ले चढवत आहे.दुसरीकडे दररोज बिबट्याची दहशत वाढत असल्याचे चित्र आहे.तसेच ऐनतपूर – वळदगाव शिवारात शेळीचा फडशा पडल्याची घटना घडली.

कारेगाव -खिर्डी शिवारामध्ये शेळीचा फस्त केली. बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.बिबट्याचा बंदोबस्त करत शेतकऱ्यांना भयमुक्त करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मृत कालवडीचा पंचनामा करत नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली.

बिबट्याचे नित्य दर्शन 

उक्कलगाव परिसरातील कुठल्या ना कुठल्या भागात बिबट्याने दर्शन दिल्याची माहिती मिळते.मात्र हाके अंतरावर बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा बळी गेल्याची घटना घडली होती.   

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!