spot_img
spot_img

‘रयत’ला बाबासाहेब नवाळेंकडून १ लाख ३१ हजारांची देणगी

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा) :- बाबासाहेब नवाळे सरांनी रयत संस्थेप्रती दातृत्व दाखवून स्वतःच्या सेवापूर्तीनिमित्ताने शाळेला एक लाख ३१ हजारांची देणगी दिली आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील न्यू. इंग्लिश स्कूलमध्ये सहा वर्षे शिकून शाळेत व सात्रळ केंद्रात दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुण्यात अभियांत्रिकीची पदविका प्राप्त केली. आपण शिकलेल्या जन्मभूमीतील शाळेतच सलग ३३ वर्षे तांत्रिक शिक्षक म्हणून कार्यरत राहिले. स्वतःच्या सेवापूर्तीच्या व कन्येच्या विवाहानिमित्ताने शाळेला एकाच वर्षात एक लाख ३१ हजारांची देणगी दिली.

बाबासाहेब गंगाधर नवाळे यांनी शाळेप्रती दाखवलेल्या कृतज्ञतेचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. नवाळे यांचा सेवापूर्ती समारंभ झाला. त्यानिमित्ताने त्यांचा व सुनीता नवाळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष अॅड. सुरेंद्र खर्डे होते.

रयत संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, उपविभागीय अभियंता श्याम मिसाळ प्रमुख पाहुणे होते. रामनाथ देवकर, बी. के. खर्डे, अजित मोरे, बाळासाहेब थिगळे, नितीन गुगळे, ज्ञानेश्वर खर्डे, पंढरीनाथ खर्डे, संजय शिंगवी, विजय लहिरे, जितेंद्र खर्डे, प्रमोद भगत, शरद पिसे, भाऊसाहेब शिरसाठ, अण्णासाहेब साबळे, प्राचार्य सुधीर वाघमारे, पर्यवेक्षक संजीवनी आंधळे उपस्थित होते.

अरुण कडू म्हणाले, नवाळेसरांनी मौलिक देणगी रुपाने संस्थेप्रती दातृत्व दाखविले. रयतमधील असंख्य विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध करून संस्थेचे नाव देश-विदेशात उंचावले आहे.

अॅड. सुरेंद्र खर्डे म्हणाले, एकनिष्ठ व विद्यार्थिप्रिय शिक्षक कसा असावा, हे नवाळे सरांनी दाखवून दिले.यावेळी अण्णासाहेब साबळे, श्याम मिसाळ, शुभम भिसे व माधुरी भिसे यांनी मनोगत व्यक्त केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!