लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी आणि संलग्नित महाविद्यालयांना नुकतेच आयएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त झाल्याची माहिती संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृृषि शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात गुणवत्तापूर्ण विविध तंञाचा अवलंब केलेल्या विविध पद्धतीसाठी सदर मानांकन बहाल करण्यात आले आहे. हे मानांकन प्रदान करण्यासाठी ऑस्टिन आंतरराष्ट्रीय आयएसओ प्रमाणपत्राचे प्रमुख डॉ शिलोत्री आणि त्यांचे सहायक अक्षय चिटणीस हे उपस्थित होते. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, संस्थेचे संचालक भाऊसाहेब जऱ्हाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, कृषीचे महाविद्यालयांचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, पायरेंस संस्थेचे संचालक डॉ. निलेश बनकर, प्राचार्य डॉ. विशाल केदारी, प्रा. भाऊसाहेब घोरपडे, प्रा. सत्येन खर्डे आदी मान्यवर देखील उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री सन्मानीय ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त श्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे आदींनी अभिनंदन केले.
प्रवरेच्या माध्यमातून कृषि शिक्षणांसोबतचं ना.विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरांतील शेतक-यांच्या थेट बांधावर जावून माहीती दिली जाते. विद्यार्थ्यामार्फत विविध शासकिय योजना,प्रत्यक्ष अनुभवांतून शिक्षण मिळावे यासाठी कृषिपुरक प्रशिक्षण!सेंद्रिय शेती,जैविक खते,गांडूळ खते, शेतमाल प्रक्रिया याविषयी माहीती दिली जाते या मानांकनामुळे संस्थेचा गौरव वाढला असल्याचे संचालक डाॅ कदम यांनी सांगितले.