कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा):-शहरातील के. बी. रोहमारे व के. जे. सोमैया महाविद्यालय तसेच एस. एस. जी. एम. अर्थात श्री सद्गुरू गंगागीर महाराज या दोन्ही महाविद्यालयाला गुरुवारी (ता.18) युवा शिवसैनिक गगन हाडा यांच्यासह युवासैनिकांनी भेट देत प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी युवासेनेच्यावतीने सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व गंगागीर महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला भोर यांचा सत्कार केला. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी हजर होते. ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध नसणे, वेळेची मर्यादा, शिक्षण व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या तक्रारींचे निराकरण करणे, अभ्यासक्रमाची पुस्तिका उपलब्ध करून द्यावी, ग्रंथालयाचा वेळ वाढवावा, विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे सुख-सुविधा देण्यात याव्यात, ग्रंथालयामध्ये चालू वर्षाचे तसेच नवीन अभ्यासक्रमाची जी पुस्तके नाहीत ती तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, बुक बँक ही योजना आपल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवावी, अशा अनेक बाबींवर गगन हाडा यांनी प्राचार्य यांच्याबरोबर चर्चा करून माहिती जाणून घेतली.
यावेळी गगन हाडा यांनी सन 2024-25 या वर्षात कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची पटसंख्या याबाबत माहिती घेतली. महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार के. जे. सोमैया कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनसाठी २३३३ तर पोस्ट ग्रॅज्युएटसाठी ६६६ असे एकूण २९९९ विद्यार्थी शिकत असल्याची माहिती मिळाली. तर सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात ग्रॅज्युएशनसाठी २३७४ विद्यार्थी तर पोस्ट ग्रॅज्युएटसाठी ६६८ विद्यार्थी असे एकूण ३०४२ विद्यार्थी शिकत असल्याची माहिती दिली.
बी. ए., बी. कॉम., बी.एसस्सी., एम. ए. इकॉनोमिक्स, इंग्रजी, हिंदी, हिस्ट्री, पॉलिटिक, मराठी, एम. कॉम. ॲडव्हान्स अकाउंटंट, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेश, एम. एसस्सी. बॉटनी, केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, मॅथ, मायक्रो फिजिक्स, पीएचडी. हिंदी, जिओग्रोफी, पॉलिटिक, केमिस्ट्री, फिजिक्स, झूलॉजी या अभ्यासक्रमाची पुस्तके देखील लायब्ररीमध्ये उपलब्ध करून द्यावेत. अशा काही बाबींची चर्चा गगन हाडा यांनी केली. काही विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्याही समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी निखील कंक्राळे, कान्हा हाडा, प्रतीक मोरे, विनायक टाक, गौतम निंदाने, वैभव शेलार, चेतन हाडा, अतुल बारहाते, रितेश वाघिले, रेहान शेख, साहिल पटवेकर जीवन बारहाते, गणेश भसाळे, साहिल पठाण आदी युवासैनिक उपस्थित होते.