विषयांतील तज्ञ व्यक्तींची विद्यापीठामार्फत अभ्यास मंडळांवर नियुक्ती होत असते. डॉ. निलेश बनकर हे व्यवस्थापन या क्षेत्रात अनेक वर्षापासून कार्यरत आहे त्यांच्या व्यवस्थापन क्षेत्रातील कार्याची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांची अभ्यास मंडळावर निवड केली आहे.
पायरेन्सचे डाॅ. निलेश बनकर यांची व्यवस्थापन विद्या शाखेच्या अभ्यास मंडळावर निवड
लोणी दि.११ (प्रतिनिधी):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकत्याच विविध अभ्यासक्रमातील अभ्यास मंडळवरील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पायरेन्स चे सचिव व संचालक डॉ. निलेश उत्तमराव बनकर यांची व्यवस्थापन विद्या शाखेतील विपणन व्यवस्थापन या विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती जाहीर झाली आहे.
डॉ. निलेश बनकर यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुप्रियाताई ढोकणे, यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.



