पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ): – माझी लाडकी बहीण योजना मी बंद होऊ देणार नाही पण त्याकरता तुम्हालाही काही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. येत्या विधानसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं तर पुढे या योजना चालू राहणार आहेत. सरकार दुसर आलं तर या योजना बंद करायचं असं म्हणतील मग या योजनेचा उपयोग काय असे पारनेर येथे माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
यावेळी पवार पुढे म्हणाले, ज्या महिला योजनेपासून काही कागदपत्रांमुळे दूर जाणार आहे. त्यावर तोडगा काढून प्रत्येकीला लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे. एक लक्षात आलं की महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. त्यासाठीच महिलांना सक्षम करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पारनेर येथे माझी लाडकी बहीण योजने सबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमानिमित्ताने राज्याचे कृषी मंत्री धनजय मुंढे, मंत्री अदिती तटकरे, रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण, बाळासाहेब नाहटा, अशोकराव सावंत, रविंद्र पगार, कपिल पवार, प्रशांत गायकवाड, संध्या सोनवणे, विश्वनाथ कोरडे, काशीनाथ दाते, वसंत चेडे, राहूल शिंदे, विक्रम कळमकर, सचिन पाटील वराळ, सुषमा रावडे, मयुरी औटी, सुभाष दुधाडे, विकास रोहकले, आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, शासकीय योजना या सर्वसामान्यांसाठी राबवल्या जात आहेत. मी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्रात ओळख आहे. वाढदिवसाच्या औचित्य साधून आज माय माऊलींना भेटायचे असे मी ठरवले. त्यामुळे मी पारनेर या ठिकाणी आलो आहे. महिलांसाठी यावर्षीच्या बजेटमध्ये अत्यंत महत्त्वाची माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली असून त्यामुळे राज्याचे बजेट सादर करत असताना वेगळा आनंद मिळाला आहे.
यावेळी अजित पवार यांनी महिलांना अनेक प्रश्न विचारले व महिलांच्या समस्या व प्रश्नांची निराकरण त्यांनी स्वतः उत्तरे देत केले. या कार्यक्रमासाठी मोठा प्रतिसाद होता ३००० पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पारनेर येथे यशस्वी झाला.