26.1 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

जागतिक तापमानवाढीवर वृक्षारोपण हाच पर्याय – डॉ. प्रदिप दिघे गुरुपौर्णिमेनिमित्त सिंधू गार्डनमध्ये वृक्षारोपण

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):- दिवसेंदिवस जंगलतोड होत असल्यामुळे तसेच वाढत्या शहरीकरणामुळे तसेच शेतीसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे जागतिक तापमान वाढत चालले आहे, त्याचा परिणाम सर्वच प्राणीमात्रांना सहन करावा लागतो आहे, त्यावर वृक्षारोपण हाच पर्याय असल्याचे डॉ. प्रदिप दिघे यांनी सांगितले.               

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या सिंधू गार्डनमध्ये एच.डी.एफ.सी. बँक आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १०० विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे मुख्य लेखापाल अशोकराव पानगव्हाणे, एच.डी.एफ.सी. बँकेचे अधिकारी सुशिल पवार, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्मिता आहेर, शिवाजी आहेर, पोलिस हेड कॉन्स्टेबल एकनाथ सांगळे, रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य आंधळे, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे एकनाथ सरोदे, तसेच सेवानिवृत्त कृषि अधिकारी रतन कडू, लोणी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक वाघमारे, सुधाकर कोते, बाबासाहेब गवते, विठ्ठलराव साळवे, महिला व तरूण वर्ग उपस्थित होते.

महसूल मंञी राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी मंञी आण्णासाहेब सारंगधर म्हस्के आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाने ३०० मिटर रनिंग ट्रॅक व इतर सुविधा या सिंधू गार्डनमध्ये उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या सुविधेचा लोणी खुर्द, लोणी बु. व परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व खेळाडू लाभ घेत आहेत.

डॉ. दिघे पुढे म्हणाले की, वृक्षारोपन करणे म्हणजे दुस-याला जीवनदान देण्यासारखे आहे. आपण लावलेले प्रत्येक झाड जगाचा तारणहार बनणार आहे, असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!