लोणी दि.११ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथील अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी दिली.
प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ अग्रिकल्चर सायन्स लोणी येथे झालेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला तर त्यामधून यामध्ये सात विद्यार्थी दुसऱ्या फेरी साठी पात्र झाले तर यामधून अंतिम चार विद्यार्थी अनिकेत राऊत,अनिकेत भालेराव, यश आहेर आणि प्रतिक पवार यांची वीरबॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये असोसिएट बिझनेस ऑफिसर म्हणून निवड झाली तर सदर विद्यार्थ्यांना तीन लाखाचे पॅकेज देण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने विविध करार करतांनाचा महाविद्यालय आणि संस्था पातळीवर प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे.शिवाय वेळोवेळी विविध कौशल्य आधारीत कार्यशाळा,माजी विद्यार्थ्याचे मार्गदर्शन यामुळे प्रवरा ही शिक्षणांसोबतचं नोकरी मिळून देण्यातही आघाडीवर आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ.सुजय विखे पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे व तसेच कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी अभिनंदन केले.
सदर मुलाखतीसाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा.भाऊसाहेब घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
मी ग्रामीण भागातील शेतकरी कुंटुबातील आहे.योग्य मार्गदर्शन, प्रक्षेञ भेटी,विविध तज्ञांचे अनुभव यामुळे मला हे यश मिळाले आहे.शेतक-याचा मुलगा बॅकेत अधिकारी झाल्याने बॅकेच्या माध्यमातून कृषि आणि कृषिपुरक पत पुरवठा करण्यावर भर देण्याचा मानस आहे
– यश आहेर (निवड झालेला विद्यार्थी)



