5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

मंत्री विखे पाटील यांच्या भूमिकेवर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिक्कामोर्तब दूध भुकटी आयात न होण्याची मिळाली ग्वाही 

शिर्डी ( जनता आवाज वृत्तसेवा):-पुढील पाच वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही असे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिले. ते भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी बोलत होते.यामुळे विरोधकांच्या फेक नरेटिव्हला चांगलीच चपराक बसली असून, पुन्हा एकदा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका दूध उत्पादकांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले. 

सध्या राज्यात दुधाच्या दरावरून विरोधकांनी राजकारण तापवले आहे. शेतकऱ्यांमध्ये फेक नरेटिव्हच्या संभ्रम निर्माण करून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आखले होते.पण केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आश्वासनाने त्याला सुरुंग लावला आहे.

मंत्री विखे पाटील यांनी नुकताच दुधाला शासकीय अनुदानासह दुधाला सरसकट ३५ रुपये भाव जाहीर केला आहे. दुध भुकटीच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी १० हजार मॅट्रिक टन भुकटीवर ३० रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दुधाला हमी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला असून त्याला केंद्र सरकारने सकारात्मता दाखवली आहे. यामुळे त्याबाबतही लवकरच कायदा केला जाईल असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

केंद्र सरकारने दूध भुकटी आयतीचा निर्णय रद्द करावा यासाठी मंत्री विखे पाटील यांनी केंद्राला पाठपुरावा केला होता. आणि या संदर्भात वारंवार खुलासा करून दिशाभूल न करण्याचे आवाहन केले होते.

पण विरोधकांनी याचे राजकारण करून दूध प्रक्रिया प्रकल्पामध्ये सुद्धा फेक नरेटिव्हचे राजकारण करण्यास सुरुवात केली होती. पण केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आश्वासनाने दूध उत्पादक शेतकरी आणि दूध प्रक्रिया केंद्राना मोठा दिलासा मिळणार आहे. असे मत मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!